पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करा !


पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करा !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
30 जुलै रोजी राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करण्याचा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना संतकृपा रेस्टॉरंट मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतून केले आवाहन.
सुधीर भाऊचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून 30 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत विविध जनसेवेच्या माध्यमातून साजरा करण्यात यावा. वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी शुभेच्छा बॅनर , होर्डिंग लावू नये. आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर अशा सेवाभावी कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे. असे आवाहन आज पत्रकार परिषदेतून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगर अध्यक्ष राहुल पावडे, राजुरा विधानसभेचे प्रमुख देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, राजू गोलीवार, शहराध्यक्षा सविता कांबळे, किरण बुटले,.विवेक बोढे, नामदेव डाहूले, यांची उपस्थिती होती.
राज्यात सर्वदूर आणि विशेषता: चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या सततधार पावसामुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती लक्षात घेता. गरजवंतांना आरोग्यसेवा तसेच जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून   वाढदिवस साजरा करण्यात यावा आणि त्या माध्यमातून त्यांच्या दीर्घायुष्य आयुष्यासाठी आणि त्यांना जनतेच्या सेवेसाठी ऊर्जा मिळावी यासाठी प्रार्थना करण्याचे आव्हान करण्यात आले. बल्लारपूर मतदार संघातील  मुल   व पोंभूर्णा  त्यातील पूर परिस्थितीचा नुकसान परिस्थितीचा आढावा ना. मुनगंटीवार यांनी घेतला आणि अतिशय संवेदनशील पणे पूरग्रस्तांना मदतीसाठी यंत्रणा कामाला लावली. समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करून जिल्ह्याच्या विकास आणि जिल्ह्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे असाच मनोदय कायम नामदार सुधीर मुनगंटीवार यांचा राहिला आहे. त्यांच्या वाढदिवशी कुठलेही मोठे सेलिब्रेशन होऊ नये अशी त्यांची मनोमन इच्छा असून सेवा सहयोग आणि सहकार्य या त्रिसूत्री वरच कार्यकर्त्यांनी काम करावे असे आव्हान देखील भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी केले आहे.
  ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसी  सकाळी आठ वाजता गिरनार चौक येथे रक्तदान शिबिर नऊ वाजता कोंडी येथे महाआरती, अकरा वाजता  पोंभुर्णा आहे ते महाआरोग्य शिबिर,  राजुरा ,घुगुस येथेही महाआरोग्य  शिबिर,मुल  येथे महाआरती  बल्लारपूर, गोंडपिपरी येथे विविध शासकीय योजनेच्या मदतीकरिता  निशुल्क सेवा दिन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन सेवा पंधरवडा म्हणून करावे असे भाजप कार्यकर्त्याकडून   कळवण्यात आले आहे.