'सेवा पंधरवडा' मुनगंटीवार यांच्या जन्मदिवसानिमित्त भाजपा पदाधिकाऱ्यांनी भागवली प्रसिद्धीची हाऊस !
'भाऊंच्या' शब्दाबाहेर झाले पदाधिकारी, शहरात लागले वाढदिवसाचे बॅनर!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा 30 जुलै रोजी वाढदिवस 'सेवा दिन ' म्हणून साजरा करावा तसेच 30 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत भाजप कार्यकर्त्यांकडून 'सेवा पंधरवाडा' म्हणून वाढदिवस साजरा करावा असे कार्यकर्त्यांकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा तथा पदाधिकारी यांच्या तर्फे
सांगण्यात आले होते.
मात्र कार्यकर्त्यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शब्दाबाहेर जाऊन पदाधिकाऱ्यांनी शहरात बॅनरबाजी, आणि वर्तमानपत्रातून शुभेच्छा पूर्वक जाहिराती देऊन सुधीरभाऊच्या वाढदिवस रंगीबेरंगी केला आहे. भाऊच्या
शब्दाला मानतात की नाही? असा प्रश्न चंद्रपूर कराना पडला आहे. एकीकडे सुधीरभाऊ दिला शब्द केला पूर्ण अशी खाती असलेले लोकनेते म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या अति उत्साहवर्धक पनामुळे सुधीर भाऊ च्या शब्दाला कार्यकर्ते पाळतात की नाही ? असा प्रश्न पडला आहे.
एकीकडे मागील पंधरा दिवसापासून जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन अनेक गोरगरिबांचे, तथा संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहेत. अशा परिस्थितीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना वाढदिवस आपला 'सेवा दिन' म्हणून साजरा करण्याचे आव्हान केले होते. परंतु अशाही परिस्थितीत सामान्य नागरिकांचा विचार न करता जिल्हाभर वाढदिवसाच्या टाहो करून बॅनरबाजीत लाखो रुपये खर्च करून काय सामान्य जनतेला फायदा याचा विचार करणण्यास भाग पाडले आहे. एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या नागरिकाचे त्यांच्याकडे लक्ष लागले असताना. कार्यकर्ते अशा पद्धतीने भाऊचा वाढदिवस करणे हे पूरग्रस्तांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखे आहे.
शहरात बॅनरबाजी, आणि वर्तमानपत्रातल्या जाहिराती न देण्याचे कार्यकर्त्यांना आव्हान करूनही लाखो रुपयांची उधळपट्टी कशासाठी ? महाराष्ट्रात आज ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती निर्माण झाली असता. लोकनेत्यांना जनतेचा कळवळा नाही का? त्यांच्या हातात आलेले पीक, सतत धार पावसाने त्यांच्या घरात झालेली पडझड लाखो लोकांचे झालेली नुकसान! अशा परिस्थितीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्हा पूरग्रस्त असताना. लोकनेत्याचा असा वाढदिवस उदो उदो कशासाठी!
30 जुलै सुधीर मुनगंटीवार यांचा जन्मदिवस सेवा दिन व सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्याची भाजप अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले परंतु भाजप पदाधिकाऱ्यांना आपल्या प्रसिद्धीची हौस भागविण्याच्या मोह आवरता आला नाही व त्यांनी शहरामध्ये फ्लेक्स बॅनर आपली प्रसिद्धी भाजप पदाधिकाऱ्यांची ही प्रसिद्धीची हाऊस नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत साऱ्यांनी बघितली आहे.
अशी परिस्थिती पुन्हा पदाधिकाऱ्यांकडून येणाऱ्या विधानसभेत होऊ नये! याची सतर्कता भाऊंनी आत्ताच घ्यावी अन्यथा पुन्हा भाऊंची गोची होण्याची शक्यता नाकारता येत नाही!
चर्चा नागपूरच्या कोर कमिटीच्या मीटिंगची !
लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीनिमित्त नागपूर येथे चंद्रशेखर बावनकुळे व संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांच्या उपस्थितीत जिल्हा निहाय भाजप कोर कमिटीची बैठक शुक्रवार दि. २६ रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चंद्रपूर येथून पालकमंत्री मुनगंटीवार यांच्यासह आमदार भांगडिया जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, राहुल पावडे ,देवराव भोंगळे, अतुल देशकर चंदन सिंह चंदेल ,डॉक्टर मंगेश गुलवाडे आणि अन्य महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दारुण पराभव चर्चा करण्यात आल्याची कळते तसेच या बैठकीत जिल्हा भाजप कार्यकर्त्यांच्या उदासीनतेबाबत चर्चा होऊन त्यात पक्षविरोधकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची सुतोवाच करण्यात आले. पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनापासून कार्य केले नसल्यामुळे मोठ्या मताधिक्याने भाजप उमेदवाराचा पराभव झाला. पदाधिकारी कार्यकर्ते हे मतदारांपर्यंत पोहोचलीच नाही अशी या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पदाधिकाऱ्यांनी ३० जुलै ते १५ अॉगस्टपर्यंत सेवा पंधरवडा निमित्त मतदारांच्या दारापर्यंत जाऊन त्यांना शासकीय योजनांच्या व मदतकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले असल्याचे ही सूत्राच्या माहिती कडून सांगण्यात येत आहे.