ताडोबातील 'नयनतारा' वाघिणीला इटलीतील गोल्डन लीफ पुरस्कार
23 सेकंदाच्या व्हिडिओला मिळाला पुरस्कार.
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघाचे विविध छायाचित्र वनजीवी प्रेमी कडून चित्रीकरण करण्यात येते. त्यातच 'नयनतारा' या वाघिणीने प्लास्टिकची बॉटल वाहत्या पाण्यातून बाहेर काढताना चित्रीकरण करण्यात आले. त्या वाघिणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर वायरल करण्यात आला होता. त्यात असे दर्शवण्यात आले की, पर्यावरणाची चिंता, आणि वन विभागाच्या व्यवस्थापनावर चिंता निर्माण करणारे दृश्य असे अधोरेखित होते.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नयनतारा या वाघिणीच्या 23 सेकंदाच्या व्हिडिओला इटलीतील इटालियन ग्रीन फिल्म फेस्टिवल पुरस्कार सोहळ्यात गोल्डन लिफ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. काही महिन्यापूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निमढेला बफर क्षेत्रात नयनतारा या वाघिणीचा वाहत्या नाल्यातून प्लास्टिकची बाटली तोंडात पकडून बाहेर काढतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला जगभरात या व्हिडिओची चर्चा झाली तब्बल 23 सेकंदाचा हा व्हिडिओ वन्यजीवप्रेमी व वन्य जीव छायाचित्रकार दीप काठीकर यांनी चित्रित केला होता. या व्हिडिओतून वाघिणीला असलेली पर्यावरणाची चिंता आणि दुसरे म्हणजे ताडोबा व्यवस्थापनाचा बेजबाबदारपणा वन्यजीवांसाठी कसा धोकादायक ठरू शकतो असे दोन संदेश मिळाले. दीप काठीकर यांनी चित्रित केलेल्या या व्हिडिओवर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या .