शासनाची जिवती तालुक्यातील आदिवासी गावातील शाळांना सावत्र वागणूक - पारोमिता गोस्वामी
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील आदिवासी गावातील जनतेची हक्कासाठी अजूनही पायपीट करावी लागत आहे.
यासाठी मागील 25 वर्षापासून श्रमिक एल्गार संघटना समस्याचा पाठपुरा करीत असून अजूनही शासन प्रशासनाच्या सावत्र वागणुकीमुळे या भागातील आदिवासीना आपल्या हक्कापासून दूर रहाव लागत आहे.
तालुक्यातील धनकदेवी, सिंगारपठार, भुरी येसापूर या गावातील शाळांची अतिशय दयनीय परिस्थिती असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक योजनेचा लाभ मिळाला नाही. शंभर टक्के आदिवासी गाव असून आदिम कोलाम समाज या गावात राहत असतात. विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती, गणवेश योजना, बूट पाय मोजे योजना, शालेय पोषण आहार, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना या सर्व सुविधेपासून येथील विद्यार्थ्यांना लाभ मिळत नसल्याचा आरोप पत्रकार परिषदेतून श्रमिक एल्गार संघटनेच्या पारोमिताताई गोसामी , विजय सिद्धावर , गावातील महिला पुरुषांची उपस्थिती होती.
या तालुक्यातील हे गाव पेसा अंतर्गत येत असून या गावाकडे लोकप्रतिनिधी, आमदार ,खासदार आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी गावातील समस्या कडे गांभीर्याने घेऊन या आदिवासी गावाचा विकास सुख सुविधा निर्माण कराव्या . तरच खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील तळागाळातला गावांचा विकास झाला असे समजल्या जाईल. अन्यथा सर्व शासनाच्या घोषणा त्या कागदावरच असून अजूनही दुर्बल भागाचा विकास न होणे या पेक्षा दुसरी शोकांतिका काय असू शकते. हे बोल की चित्र या आदिवासी गावातील अजूनही जसेच्या तसेच आहे.
शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही विद्यार्थ्यांना त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम प्रशासनाकडून होत आहे. अनेक शाळा मोडकळीस आले असून कधी धारासाईला जातील अशी विचित्र अवस्था या गावातील शाळांची झाली आहे. याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित विधानसभा क्षेत्रातील आमदार, खासदार, आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी या वंचित राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्येकडे जातीने लक्ष देण्याची मागणी आज पत्रकार परिषदेतूनही केली. अन्यथा श्रमिक एल्गारद्वारे मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.