... या गावात खाली घरात बिबट्याचे तीन शावक आढळले , गावात दहशतीचे वातावरण !




... या गावात खाली घरात बिबट्याचे तीन शावक आढळले , गावात दहशतीचे वातावरण !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील बाळापुर खुर्द गावात आज सोमवारी सकाळी साडेसात वाजता. एका खाली घरामध्ये बिबट्याचे तीन पिल्ले आढळी. मादी बिबट्याने जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील पंधरा दिवसापासून या गावात बिबट्याची वर्दळ सुरु होती. गाव दहशत होते.
याच काळामध्ये गावातील अनेक पाळीव प्राण्यांना या मादी बिबट्याने आपले निवाला बनवले होते. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
बिबट्याचे तीन शावक घरात सापडल्याने गावकऱ्याने पाहण्यासाठी गर्दी केली आहे. मात्र या बिबट्याचा आपल्या पिल्यांसाठी पुन्हा धुमाकूळ होण्याची भीती नाकारता येत नसल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा  इशाराही वन विभागाकडून देण्यात आला आहे.
गावातील वाघिणीने मारलेल्या गुरांमध्ये लोकेश ठवरे, काशिनाथ तरोणे, दिलीप सोनकर, शंकर व्हटकर, मंगेश गोंगल यांच्या गुरांचा समावेश आहे. बिबट्याच्या या हल्ल्यांमुळे गावातील लोक घाबरले असून त्यांच्या सुरक्षेची त्यांना भीती वाटत होती.
त्यामुळे मावरात सकाळी बिबट्या घरातून बाहेर पडत असताना एका ग्रामस्थाने तो पाहिल्यानंतर लगेच इतर ग्रामस्थांना माहिती दिली. गावकऱ्यांनी ते घर गाठून चौकशी केली असता त्यांना घराच्या एका कोपऱ्यात तीन पिल्ले दिसली.
या घटनेची माहिती गावचे सरपंच कमलाकर ठवरे यांनी तातडीने वनविभागाला दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बाळापूर गाठून परिस्थितीचा आढावा घेतला.
रिकाम्या घरात शावकांना जन्म दिला:
ज्या घरात ही घटना घडली त्या घरात कोणीही राहत नव्हते. त्यामुळे बिबट्याने सुरक्षित समजून तेथेच पिल्लांना जन्म दिला. या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे व कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी वनविभाग पुढील कारवाई करत आहे.