... हे ही लोकप्रतिनिधी आहेत? जिल्हा प्रशासनाला नागरीकरचा प्रश्न !




... हे ही लोकप्रतिनिधी आहेत? जिल्हा प्रशासनाला नागरीकरचा प्रश्न !

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हाधिकार्यालयातील ध्वजारोहण

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
राज्याचे व सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाकडून चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार, शिक्षक विधान परिषदेचे आमदार सुधाकर अडबाले. यांना आमंत्रित करण्यात आले . ते ध्वजारोहणासाठी उपस्थित होते. याचबरोबर जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन,  महानगरपालिकेचे आयुक्त  विपिन पालीवार, यांची उपस्थिती होती.
 77 व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्याच्या संदेश देताना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी  म्हटले की, हा देश संविधानावर चालणारा असून. या देशाला स्वातंत्र्य  मिळवण्यासाठी हजारो  हुतात्म्यानी आपली आहुती  देत स्वातंत्र्य मिळवले.  म्हणून आपले कर्तव्य, दाहीत्व जबाबदारी म्हणून आपण देशासाठी काय देऊ शकतो. ही प्रत्येकाची जबाबदारी म्हणून कार्य केले तर या जगामध्ये 
  141 करोड जनतेनत देश सुजलाम, सुफलाम समृद्ध करण्याची ती शक्ती भारत मातेच्या  सुपुत्रात  आहे. अशा शुभ संदेश दिला. 
 याच बरोबर या कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, तथा कर्मचारी यांना पुरस्कार बक्षीस  वितरण करण्यात आले. हे करीत असताना चंद्रपूर शहरातील नागरिकांना एक  अचम्बवणारे दृश्य निदर्शनास आले. आणि चर्चा सुरू झाली. की,
... हे  लोकप्रतिनिधी नाहीत का?
 चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेने हजारो लाखोच्या  मताधिक्याने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना,  ध्वजारोहणासाठी बोलावल्या नंतर जिल्हा प्रशासनाकडून त्यांना  झेंडावंदनासाठी समोर बोलवल्या जात नाही, एवढेच नाही तर बक्षीस वितरणाच्या सोहळ्यातही त्यांना समोर  बोलवल्या गेले नसल्याची शल्य जनतेसह लोकप्रतिनिधींना   जाणवू लागली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच, जनतेने निवडून दिलेल्या  लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या  लोक प्रतिनिधींची  प्रशासनाकडून  ही चूक झाली तर नसावी ना?  हा देशाचा राष्ट्रीय सण समजणाऱ्या स्वातंत्र्यदिनी  आपण प्रत्येक नागरिका सह लोकप्रतिनिधीचाही सन्मान व्हावा! राजकीय हेवेदावे, आणि उकिरडे  दूर ठेवण्याचा मनसोबा असेल, तरच  राजकीय मोठेपणा समजण्यात काही हरकत नाही!
ध्वजारोहण पालकमंत्री म्हणून आपणच करायचे होते. पण जो दुसऱ्यांना मान देतो.  मुळातच तोच स्वतः सन्माननीय असतो. असा मोठेपणा  आपला असता तर, छोटासा डाग  धुवून निघला असता.  पद म्हणजे मी कुणी मोठा आहे. हे ज्या दिवशी मनात येईल त्या दिवसापासून आपली उत्तरती कडा सुरू झाली हे  लक्षात यायला नको!
 आपण कितीही मोठे कार्य केले,  पण थोडी राजकीय चूक! ही जनतेत चर्चेचा विषय होऊन जातो . म्हणून प्रशासनाने  राजकीयांची दूरदृष्टी ठेवून सन्मान पूर्वक  लोकप्रतिनिधींना  त्यांचा अधिकार सन्मान  मिळाला पाहिजे. अशी सर्वसामान्य  नागरिकांची अपेक्षा आहे.