नागभीड येथे सामुहिक बलात्कार, विडीओ सोशल मीडियावर वायरल आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करा...भाजप व अन्य संघटनेची मागणी



नागभीड येथे सामुहिक बलात्कार, विडीओ सोशल मीडियावर वायरल
आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करा...भाजप व अन्य संघटनेची मागणी*

उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन.....

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
नागभीड शहरात काल माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका मुलीवर काही नराधमांनी सामुहिक अत्याचार करून त्याचे विडीओ सोशल मिडीयावर वायरल केल्याप्रकरणी आज सर्वत्र संताप व्यक्त केला असून आज, भारतीय जनता पार्टी नागभीड,भाजपा महिला आघाडी, विश्व हिंदू परिषद,बजरंग दल, दुर्गा विहिणी,मातृशक्ती संघटना यांच्या द्वारे घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करीत.घटनेत सहभागी असलेल्या सर्व आरोपींना लगेच अटक करून कठोर कारवाई करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना सामुहिक निवेदन देण्यात आले. आरोपीविरुद्ध तत्काळ कठोर कारवाई न झाल्यास नागभीड शहरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सहभागी पक्ष व संघटनेद्वारा देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे,चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, तालुकाध्यक्ष संतोष रडके,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आवेश पठाण, ओबीसी आघाडी अध्यक्ष रामदास बहेकर,महिला आघाडी तालुका अध्यक्ष इंदुताई आंबोरकर,महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस प्रिया लांबट,जहांगीर कुरेशी, डॉ.पवन नागरे,बंडू गेडाम ,जावेद शेख ,रमेश ठाकरे,विजय ठाकरे,रमाकांत ठाकरे,रवी देशमुख ,धनराज काटेखाये, अशोक पिसे,दिनेश समर्थ,बाबा जांभुळे,चंदन चावरे,हुमेश अमृतकर,संजय मालोदे,गुड्डू भोयर,रोमी कटारे,अनंता बावणे,योगेश मिसार,विशाल बावणे,प्रफुल मोहजनकर, राम वैद्य,प्रवीण सोनटक्के,सागर पुराम,धीरज पूराम,उत्कर्ष राऊत,आदित्य वाढई,अभिषेक मुळे,अनमोल कामडी,अंकुश कामडी,पवन कामडी,रोशन आटमांडे,स्नेहा कुर्झेकार,संचिता येरणे, मनीषा येरणे,नीता गीरीपुंजे व असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मनोरुग्ण महिलेवर अतिप्रसंग करुन व्हिडीओ वायरल करणारे आरोपी तीन तासात अटक...

आज दिनांक २३ ऑगस्ट, २०२४ रोजी १०:०० वाजता सुमारास पोलीस स्टेशन नागभीड

हद्दीत सोशल मिडीया व्हॉटसअपवर आक्षेपार्ह व्हिडीओ वायरल झाल्याचे माहिती पडताच नागभीड पोलीसांनी त्याची तात्काळ दखल घेवुन व्हिडीओ मधील पिडीत महिलेची शोध घेवुन तिची ओळख पटविण्यात आली. लागलीच सदर व्हिीडीओ मधील आरोपीतांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पोलीस पथके तयार करुन आरोपीतांचा शोध घेतला असता सदर गुन्हयात सामील सर्व आरोपीतांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे सांगुन सदर

व्हिडीओचे घटनास्थळ नागभीड बस स्थानकातील मुत्रीघर मधील असून दिनांक १२/०८/२०२४ च्या मध्यरात्री दरम्यान पिडीत/मनोरुग्ण महिलेस एकटी असल्याचे पाहुन तिला मुत्रीघरात नेवुन तिचेसोबत एका आरोपीने बळजबरीने अतिप्रसंग केला त्यावेळी त्याच्यातील दुसऱ्या आरोपीने मोबाईलवर त्याचे व्हिडीओ काढले असुन इतर आरोपींनी गुन्हा करण्यास सहकार्य केले.

सदर आक्षेपार्ह व्हिडीओ त्यातील एका आरोपीने त्याचे एका मित्राला व्हॉटसअॅप वर पाठविले असता त्याने सदर व्हिडीओ वेगवेगळे लोकांना व्हॉटसअॅपद्वारे पाठवुन सदर व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे.

सदर आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन नागभीड येथे अपराध क्रमांक २६२/२०२४ कलम ६४ (२) (क), ७० (१), ८७, १२६ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम ६७, ६७ (अ) माहिती व तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे.

सदर गुन्हयाचे घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिनकर ठोसरे यांनी तात्काळ भेट देवुन प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवुन मनोरुग्ण महिलेस तातडीचे औषधोपचारासाठी पाठविण्यात आले असुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा उघडकीस आणुन पिडीता व आरोपीतांची ओळख पटविण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे, सपोनि श्री दिलीप पोटभरे, पोउपनि अनुराधा फुकट पोस्टे. नागभीड, पोलीस निरीक्षक श्री विजय राठोड, पोस्टे. सिंदेवाही, सपोनि श्री अजीतसिंग देवरे, पोस्टे. तळोधी, सपोनि प्राची राजुरकर, सपोनि श्री राजकिरण मडावी पोस्टे ब्रम्हपुरी तसेच गुन्हे शोध पथकाचे पोउपनि विनोद भुरले, पोउपनि रोशन इरपाचे व स्टॉफ तसेच सायबर व फॉरेन्सिक एक्स्पर्टची टिम यांनी सदर गुन्हा काही तासाचे आंत उघडकीस आणुन मोलाची कामगिरी बजावली
आहे.

चंद्रपूर पोलीसांद्वारे आवाहन करण्यात येते की, सदर घटने संदभनि कोणताही व्हिडीओ समाज माध्यमावर पाठवु नये किंवा कोणतीही अफवा पसरवू नये जेणे करुन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे कृत्य केल्यास संबंधीतांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल.