शासकीय कर्मचाऱ्यासह ,अराजकीय नवजुगारबाजाना अटक फार्महाऊसमध्ये सुरू होता जुगाराचा खेळ




शासकीय कर्मचाऱ्यासह ,अराजकीय नवजुगारबाजाना अटक
फार्महाऊसमध्ये सुरू होता जुगाराचा खेळ

दिनचर्या न्युज '-
चंद्रपूर :-
चंद्रपूर: किटाळी येथील रोडे फार्महाऊमध्ये सुरु असलेल्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास धाड टाकून नऊ जणांना अटक केली. या कारवाईत एक लाख दोन हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिवसेना ( उबाटा) माजी पदाधिकारी जयदीप प्रकाश रोडे (४०), शिवराज शामराव बांधुरकर (४४), अरविंद रामकृष्ण कुचनकर (३८), अमित विठ्ठलराव बिकणकर (३५), लव्ह शंकर गौरकर (३८), महेश वामनराव ठेमसरक (४१), जित चाको सॅम (३५), राहुल रामचंद्र झाडे (३७), सुभाष तुळशिराम पोईनकर (४१) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
राजकीय, अराजकीय आणि सा.बा. शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या. दोन जुगारबाजांना यात अटक करण्यात आली आहे. सूत्राच्या माहितीनुसार हे दोन जुगारबाज नेहमीच कार्यालयात रात्री जुगार खेळत असतात. यापूर्वीही साबा कार्यालयात जुगार खेळत असल्याची बातमी काही वर्तमानपत्रात प्रसिद्धी झाल्या होत्या? ही कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दुर्गापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना रोडे फार्म हाऊस
येथील वरच्या खोलीत जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी धाड टाकली, यावेळी नऊ जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी जुगाराचे साहित्य, रोकड असा एक लाख दोन हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नऊही जणांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात विनोद मुरले यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.