दलाली करणाऱ्या, निव्वळ श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या शिक्षक संघटनांपासून शिक्षकांनी सतर्क रहा - आ. सुधाकर अडबाले
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा परिषद पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सहकारी पतसंस्था मर्या. चंद्रपूरच्या वतीने आज दिनांक ८ सप्टेंबर २०२४ रोजी मा. सा. कन्नमवार सभागृह चंद्रपूर येथे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेस उद्घाटक म्हणून आमदार श्री. सुधाकर अडबाले उपस्थित होते.
यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष मनोज गौरकर, उपाध्यक्ष स्मिता अवचट, मानद सचिव विजय कुमरे, खनिजदार ज्योती गावंडे, संचालक राजू लांजेकर, संजय निकेसर, अरविंद चिडे, सुनील ढोके, मनोज काकडे, अमोल देठे, विपीन धाबेकर आदींची उपस्थिती होती.*
याप्रसंगी जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
सभासदांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी पतसंस्था महत्वाची असते. पतसंस्था संचालकांनी पतसंस्थेचे मालक न होता, विश्वस्त म्हणून कार्य केल्यास पतसंस्था भरभराटीस येते. मी निवडून आल्यापासून माध्यमिक शिक्षकांसोबतच प्राथमिक शिक्षकांच्या समस्या घेऊन सतत बैठका व सभागृहात घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करीत असतो. आज शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम कटिबध्द असताना काही फक्त लेटर पॅडवर असलेल्या, दलाली करणाऱ्या आणि काहीही न करता निव्वळ श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या शिक्षक संघटनांपासून शिक्षकांनी सतर्क रहावे, असे आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी यावेळी आवाहन केले.