एका वाऱ्याच्या तडाख्यात !... पडलो ?




एका वाऱ्याच्या तडाख्यात !... पडलो ?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मी शिवाजी शहाजी भोसले, या भूमीचा चक्रवती सम्राट मला या भूमीत विलीन होऊन चारशे वर्ष झाली. तरी आदर्श शोधायची वेळ आल्यावर चारशे वर्ष मागवून जाऊन आमच्यापर्यंत का यावे लागते. तो आदर्श तुमच्यात नाही का? कसा असेल? तुमच्या रक्तात भेसळ झाली. तो आदर्श विकला गेला आहात! काही स्वार्थात म्हणून आम्ही काल वाऱ्याच्या एका तडाक्यात पडलो. पडलो तर त्या राज्यात जिथे आम्ही जन्माला आलोत, लढलो, घडलो आणि काल तुमच्या राज्यात पडलो. त्याची कीव येते! तुमची, तुमच्या फुरकट विचारांची आणि खबरदार याला स्वराज्य म्हणाल तर! हेच स्वराज्य नाही दिल्लीचा तक्त राखणारा स्वराज्य आहे. असा उदगीरी करणार नाही. राज्यांना दिशा देणार आमचं स्वराज्य आहे. शुल्लक स्वार्थासाठी राज्य विकणार नाही. बळीराजाला सोन्याचा नागर देणार स्वराज्य आमचं, त्याला फाशीचा दोर देणार स्वराज्य नाही. सर्वसामान्य जनतेला करमुक्त करणार स्वराज्य आहे आमचं. त्याच करातून भ्रष्टाचार करून स्वतःचे इमले बांधणारे नाही. अठरापगड जातींना व बारा बलुतेदार, सर्वधर्मीयांना एकत्र घेऊन चालणार असं स्वराज्य आहे आमचं! चारसे वर्ष आमचे विचार घेऊन उभे राहिलेले आमचे किल्ले म्हणजे स्वराज्य आहे. आमचं त्याचं संवर्धन तर सोडाच तुम्हाला साधे रस्तेही बांधता आले नाही. स्त्रिया ,आया - बहिणींना मान देणार स्वराज्य आहे आमचं. तिचा पदर खेचणार नाहीत. ज्यांनी ती हिंमत दाखवली त्याचा पुरुषार्थ ठेचला , चामडी सोलून देहाचा चौथा केला . ..त्याचं तुम्ही काय केलं. बोला इतकं थंड रक्त मराठ्याचं असू शकत नाही. हेच खर आहे. तर आमचं नाव लावण बंद करा! ते बॅनर ते झेंडे फाडून टाका आणि मरा स्वतःच्या कर्माने हे राज्य आमच आहे. त्याला स्वतःच्या बापाची जहागीर समाजाल तर खबरदार! जिथे पडलो तरी तिथे जिवंत आहोत! आम्ही आमच्या विचारांनी आणि हे विचारच घडवतील या संवेदन मनाला क्रांती राजे आहोत आम्ही! पण हात जोडून विनंती करतो. वेळ गेलेली नाही. जागे व्हा! ते आपल्या धमण्यामध्ये जागवा! मर्द मराठ्याचं सळसळत रक्त, अरे कोण होते माझे मावळे ही सर्व सामान्य जनता होती. मी त्यांना अभय दिलं त्यांनी स्वराज्य घडवून आणलं. माझ्या लेकरांनो ही तेच वेळ आहे जशास तसे वागण्याची! महाराष्ट्र घडवण्याची! आपल्या महाराष्ट्राची अस्मिता राखण्याची,  कर्तव्य आहे या महाराष्ट्राला ते स्वराज्य निर्माण करून देण्याची !
हर हर महादेव ! हर हर महादेव!

यात सांबर , सोशल मीडियाच्या आधारावर घेतलेल्या माहितीचा सोर्स आहे.