टोल घ्या हो ,पण रस्ता बनवून द्या! नागरिकांची आँर्थ मागणी ! आष्टी ते अहेरी मार्गाचा जीवघेणा प्रवास...!



टोल घ्या हो ,पण रस्ता बनवून द्या! नागरिकांची आँर्थ मागणी !
आष्टी ते अहेरी मार्गाचा जीवघेणा प्रवास...!
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :(गडचिरोली अहेरी प्रतिनिधी) :-
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल आणि नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात सरकार कुठलेही असो परंतु इथल्या नागरिकांच्या नशिबी वंचना ही ठरलेलीच आहे. यांना कुठल्याही  मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाही. ते मग एसटी बस असो किंवा आरोग्य सुविधा असो किंवा दळणवळणाच्या सुविधा असो. येथील आदिवासी बांधवांना आपला जीव मुठीत घालून अनेक काम करावे लागतात. सुरजागड प्रकल्प सुरू झाल्यापासून या मार्गावर दळणवळणाची वाहने प्रचंड प्रमाणात वाढली आहेत आणि त्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. सध्या स्थितीत आष्टी ते अहेरी मार्ग हा मृत्यूला आमंत्रण देणारा मार्ग किंवा शारीरिक इजा पोहोचवणारा मार्ग असेच संबोधले जावे अशा प्रकारचा झालेला आहे. अनंत कालापासून अहेरी येथे गोंड राजाचे वैभव आहे आणि येथीलच दोन राजे हे सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत एक माजी तर एक वर्तमान अशी स्थिती असताना सुद्धा या रस्त्याची दैनावस्था का बरं झाली असावी हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. आणि यामागे कोण हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. अधिक खोलवर विचार करता सुरजागड प्रकल्पात सुरू असलेली बेकायदेशीर कामे याचा गंध पत्रकारांना किंवा सामान्य जनतेला पडू नये म्हणून हा रस्ता असाच ठेवला असावा का असाही प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.
25 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता पासून विद्युत व मोबाईल टावर चे कव्हरेज नसल्याने दूरसंचारण कंपनीच्या ढिसाळ व्यवस्थेमुळे वारंवार नागरिकांना याचा मनस्ताप  होत आहे.
 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी अजूनही या जिल्ह्याची  प्रगती   झाली नाही. जिल्ह्यात मोठमोठ्या  कंपन्यांनी सुरजागड सारखे प्रकल्प  या परिसरात वाढल्याने  परिसरातील पर्यावरणावर मोठा परिणाम होत आहे. ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने  येतील महामार्गाच्या रस्त्यावर  प्रवास करताना अनेकांना आपले जीव गमवावे लागले तर   काहींना अपंगत्व  आले आहेत. 
 अतिशय दयनीय अवस्था आष्टी ते अहेरी महामार्गाची झाली आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे महामार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. अनेक अपघात झाले. अनेकांना आपले जीव गमवावे लागले. मात्र या परिसरातील लोकप्रतिनिधी मुंग गिळून चूप बसले आहेत. 'भाड मे जाये जनता'  अपना काम बनता! असे म्हणत.  
 पुन्हा निवडणुकीला सक्रिय झाले आहेत.
 आता नागरिकांना सरकारला अशी म्हणण्याची वेळ आली  की, आम्ही आता 'टोल भरतो, पण रस्ता बनवून द्या! अशी नागरिकाची आँर्थ मागणी  होत आहे.
 लोकप्रतिनिधीच्या उदासीन धोरणामुळे आष्टी ते अहेरी महामार्गावर  रडखळलेल्या रस्त्यामुळे आम नागरिकाच्या जीवाशी खेळखंडोबा सुरू आहे. लोकप्रतिनिधीच्या उदासीनतेमुळे रस्त्याचा विकास हा भकास झाला असून स्वतःचा विकास करण्यात  लोकप्रतिनिधी धन्यता मानत असल्याचे नागरिकात प्रतिक्रिया उमटत आहे.