चंद्रपूर निमा शाखेद्वारा महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या डाॅक्टरांच्या संघटनेद्वारा राष्ट्रपिता महात्मा गांधी आणी लाल बहादूर शास्त्री यांची जयंती चंद्रपूर शहरातील गंजवार्ड स्थित निमा हाॅल येथे साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम निमा चंद्रपूर शाखेचे अध्यक्ष डॉ दिपक भट्टाचार्य, ज्येष्ठ निमा सदस्य डॉ राजु ताटेवार व ईतर वरिष्ठ निमा सदस्यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले व दिपप्रज्वलन करून आदरांजली वाहिली.
त्यानंतर उपस्थित सर्व निमा सदस्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली अर्पण केली. दोन्ही महापुरुषांच्या जयजयकाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचलन निमा चंद्रपूर शाखेचे सचीव डॉ शरद रणदिवे यांनी तर आभारप्रदर्शन कोषाध्यक्ष डॉ नितीन बिश्वास यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ.जितेंद्र खोब्रागडे,डॉ.अमित कोसूरकर ,डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे , डॉ. सुधीर मत्ते, डॉ.विजय भंडारी, डॉ. रविकुमार चिंतावार, डॉ. अमित डांगेवार, डॉ. अनिल कुकडपवार, डॉ. यशवंत सहारे, डॉ. सागर भोयर, डॉ. मंगेश भरडकर, डॉ. गोपाल सरबरे, डॉ. कुणाल पांढरे, डॉ. किशोर भट्टाचार्य, डॉ. मनीष मोते, डॉ. परीक्षित वांढरे, पार्थ बदखल यांची उपस्थिती होती.