पालकमंत्र्याची 'मीट द प्रेस' ,
चंद्रपूरच्या विकासासाठी सकारात्मक पावित्रा
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपुर जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री नामदार प्रा.डॉ.अशोक उईके यांची आज चंद्रपूर जिल्हा नियोजन आराखडा बैठक नियोजित होती.दरम्यान त्यांनी राणी हिराई महोत्साब इथे उदघाटनीय कार्यक्रमाप्रसंगी उपस्थिती दर्भाविली व नंतर वन अकादमी येथील जिज्ञासा भवन इथे 'मीट द प्रेस' घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना सामोरे जात जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक पावित्र्य घेऊ गोरगरिबापासून सर्वसामान्यांना विकासाच्या दिशेने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला या जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले त्याला कुठेही तळा न जाता जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक पावित्रा आपण घेणार आहे. असे पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्र्यांनी म्हटले.दरम्यान त्यांनी सांगितले की,मी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासा संदर्भात तुम्हाला पूर्णतः आश्वस्त करतो सर्व जन प्रतिनिधीना व जिल्ह्यातील सर्व विधानसभा निहाय क्षेत्राना पूर्णतः न्याय देणार आहे.कुठलीही किंतु परंतु अशी बाब तरी मी स्वतः च्या स्वार्थासाठी व माझ्या पालकमंत्री पदाच्या जबाबदारी विरोधात कार्य होणार नाही.असे आश्वास्त केले व भविष्यात मला भरपूर काही चांगले व जनहिताचे कार्य करायचे आहे त्यामुळे मला थोडा अभ्यास करू द्या.मी निश्चितच सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार. अशा पद्धतीने त्यांनी सर्वांशी सांगोपांग चर्चा करीत खेळी मेळी च्या वातावरणात 'मीट द प्रेस' परिषद पार पाडली.
चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासीच्या विकासाच्या प्रश्नावर, होत असलेल्या जिल्ह्यातील प्रदूषणावर, जिल्ह्यात होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य सेवेपासून तर तेथील व्यवस्थेपर्यंत प्रशासनाला दोन दिवस संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना त्या त्या कार्यालयात भेट देण्याची व तेथील अहवाल सादर करण्याची आपण माहिती दिलेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात “मे. स्मार्ट सर्विसेस प्रायवेट लिमिटेड” कडे कामगारांचे व्यवस्थापन करण्यासाठी कंत्राट दिले आहेत परंतु येथील कामगारांना कंपनीकडून पिळवणूक सुरू असल्याचे पालकमंत्र्यांना सांगितले. असता त्या संदर्भात आपण लवकरच यांचे वेतन, त्यांचा पीएफ, आणि संबंधित कामगारांना 50 वर्षाच्या हे वर्षानंतर काढल्या जातात या संदर्भात आपण लवकरच याकडे लक्ष देणार असल्याची माहिती.
जिल्ह्यात विकासाच्या दृष्टीने भाजपाचे पाच आमदार असून कुठल्याही विकासाच्या निधीसाठी आपण प्रयत्नशील असणार आहोत.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या बाजूनी आपण कटिबद्ध सातत्याने विकासाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग, प्रदूषण याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विश्वासाने आपण जिल्हा विकसित करण्याचा प्रयत्न करू असे म्हणाले.
26 जानेवारीला पत्रकारासोबत झालेल्या अघटनित घटनेला आपण संबंधित अधिकाऱ्यांना असे पुनश्या होता कामा नये पत्रकार हा देशामध्ये चौथा स्तंभ म्हणून आपण त्याच्याकडे बघतो त्या पत्रकाराचा सन्मान करणे ही आमची जबाबदारी आहे असे ते म्हणाले.
सर्व अधिकाऱ्यांनी आठवड्यातून दोनदा तरी वेगवेगळ्या कार्याला जाऊन विजिट मारली पाहिजे अशी तरतुदी आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर केली आहे.
पत्रकारांसोबत सुसंवाद साधून या जिल्ह्यामध्ये प्रामाणिकपणे काम करेल कोणत्याही माझ्या पत्रकार बांधवांनी माझ्यावर बोट दाखवण्याची वेळ येणार नाही असे मी आपणास ग्वाही देतो.
मी आदिवासी विकास मंत्री असल्यामुळे 10हजार आदिवासी बांधवांना विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे. आदिवासी आश्रम शाळेत मुक्काम करणार आहे. अशा प्रकारच्या विविध समस्या घेऊन पत्रकारांबरोबर मीट द प्रेस च्या च्या माध्यमातून संवाद साधला यावेळी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, राजुराचे आमदार देवराव भोंगळे, वरोरा चे आमदार करण देवतळे यांची उपस्थिती होती.