स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण अंतीम तारीख 27 नोव्हेंबर

Image result for स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणचंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन कार्यालयातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी प्रवेश निश्चित करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर आहे .आदिवासी विद्यार्थ्यांनी कौशल विकास विभागाच्या या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळावे यासाठी जिल्हा कौशल विकास व रोजगार मार्गदर्शन कार्यालयातर्फे स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण दिले जाणार आहे. साडेतीन महिन्याच्या या प्रशिक्षणासाठी गुणवान, होतकरू व स्पर्धा परिक्षेत आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना 27 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन विभागाने केले आहे.
आदिवासी उमेदवारांना शिपाई, लिपीक, तलाठी अशा वर्ग-3 व वर्ग-4 पदांकरीता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परिक्षेची पूर्व तयारी करून देण्याकरीता आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथील स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षण दिनांक 1 डिसेंब 2018जे 15 मार्च 2019 पर्यंत साडे तीन महिने कालावधीचे प्रशिक्षण दिनांक 1 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा रूपये 1000/- विद्यावेतन देय राहील. या प्रशिक्षण कालावधीत खालील अटीची पूर्तता करणाऱ्या अनु-जमाती प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांना दिनांक 27 नोव्हेंबर 2018 पर्यंत अर्ज स्वत: किंवा टपालद्वारे खालील पत्यावर सादर करावेत. अर्जात पूर्ण नांव, पत्ता, दुरध्वनी, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, जात व प्रवर्ग, जिल्हा कोशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचा नोंदणी क्रमांक बाबीचा उल्लेख करावा व सोबत आवश्यक कागदपत्रे- जोडावीत, अर्ज करण्याकरीता (Employment Card) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राची नोंदणी असणे आवश्यक आहे. मुलाखत (Interview) दिनांक 28 नोव्हेंबर 2018 रोली सकाळी 11.00 वाजता घेण्यात येईल व निवड यादी त्यानंतर करण्यात येईल.

प्रशिक्षणाच्या अटी :- 1) उमेदवार अनु.जमाती (आदिवासी) प्रवर्गातील असावा.

2) उमेदवाराचे किमान वय 18 वर्षापेक्षा कमी असावे.

3) उमेदवार किमान एच.एस.सी परिक्षा उत्तीर्ण असावा.

1 ) उमेदवाराचे नांव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नोंदणी

असणे आवश्यक आहे. (Employment Card)

आवश्यक कागदपत्रे :- ) शाळा सोडल्याचा दाखला.

2) जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र.

3) मार्कशीट (एसएससी / एचएससी / पदवी)

4) आधार कार्ड (UID)

5) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे नोंदणी कार्ड.

अर्ज कार्यालयाच्या वरील पत्यावर पाठवावे, असे आवाहन कौशल्य विकास व रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघामारे यांनी केले आहे.