चंद्रपूर मनपात सी.एम चषक बैठक संपन्न

       चंद्रपूर/प्रतिनिधी:

दिनांक २७/११/२०१८ रोजी मा. महापौर सौ. अंजली घोटेकर यांचे अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री चषक बाबत बैठक घेण्यात आली. 
                           देशातल्या सर्वात मोठ्या खेळ महोत्सव सी.एम. चषकाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात येणार आहे. त्यानुसार आपल्या चंद्रपूर शहरात हि या स्पर्धेची सुरुवात होणार आहे.  खेळांविषयी आवड असलेल्या तरुण मुलां-मुलीं करीता  एक चांगले व्यासपीठ निर्माण करून देण्याचे  उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेद्वारे खेळाडू आपल्या शहराचे नाव राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करणार.  तरी सर्व युवक युवतींना या स्पर्धेत  सहभागी व्हावे व आपली नोंद करावी. असे आवाहन महापौर सौ. अंजली घोटेकर यांनी केले. या करिता ऑनलाईन वेबसाईट https://www.cmchasak.com सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे. अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.
                            या प्रसंगी उपमहापौर श्री. अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती श्री राहुल पावडे, महिला व बालकल्याण सभापती सौ. जयश्री जुमडे, उपसभापती सौ. शीतल गुरनुले, सभापती झोन क्र. १ सौ. माया उईके, सौ. शिला चौहान, सौ. वंदना तिखे, सौ. वनिता डुकरे, सौ. संगीत खांडेकर नगरसेवक श्री. सोपान वायकर, श्री. रवी आसवानी, ऍड. श्री राहुल घोटेकर तसेच सी.एम. वाररुम चे श्री. दिनेश रिंगणे उपस्थित होते.