बिरसा मुंडा यांच्या १४३ व्या जयंती निमित्य महावितरणकडून आदरांजली अर्पण करण्यात आली. काटोल रोड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. यावेळी यावेळी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण)सुहास रंगारी, महाव्यस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता हरीश गजबे, नारायण आमझरे, कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवार, सहायक महाव्यस्थापक (मा.स.)वैभव थोरात, व्यस्थापक(वित्त व लेखा) अतुल राऊत, उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे आदींसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.