भव्य राम मंदिर निर्माण हेतू संकल्प यात्रा व महाआरती

मनोज चीचघरे/पवनी(भंडारा):

भव्य राम मंदिर निर्माण हेतू संकल्प यात्रा व महाआरती च्या दरम्यान भारतीय विद्यार्थी सेना व शिवसेना पवनी तालुका तफेँ  भव्य श्रीराम रॅली पवनी नगरमध्ये मीरवनूक करण्यात आली, पवनी नगरीत श्रीरामच्या  घोषणा देण्यात आले जय महाराष्ट्रच्या गर्जनेने  संपूर्ण पवनी नगरीत वातावरण भगवामय झाले होते. श्री राम मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली, जय श्रीराम, जय हिंदूराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र अशा घोषणा देण्यात आल्या, या कार्यक्रमामध्ये प्रशांत भाऊ भुते उप तालुका प्रमुख पवनी, विजय भाऊ काटेखाये तालुका प्रमुख पवनी, जितेश खार, विद्यार्थी सेना भंडारा नरेश बावनकर, भोजराज वैद्य, सुमेद खान, देवराज बावनकर, परसराम बावनकर  मोठ्या संख्येने विद्यार्थी सेना व शिवसेनेचे कार्यकरते उपस्थित होते.