कढरेत भव्य टेनिस बाँल स्पर्धा


खबरबात/ गणेश जैन
बळसाणे : साक्री तालुक्यातील कढरे गावात ( ता.१९ ) पासून जय बजरंग क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य टेनिस बाँल स्पर्धा ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जय बजरंग क्रिकेट क्लब च्या चषक २०१८ या खूल्या टेनिस बाँल स्पर्धेचे सोमवारी सकाळी १० वाजता चिमठाणे गटातील व सामाजिक कार्यकर्ते डॉ. भरत राजपूत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले
जय बजरंग क्रिकेट क्लब २०१८ च्या अध्ययस्थानी कढरे गावातील सरपंच महेंद्रसिंग गिरासे , प्रदीपसिंग राजपूत , डॉ. संजय राजपूत यांच्यासह गावातील व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
भव्य टेनिस बाँल स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेत्या संघास १५ , ५५५ रुपये डॉ. भरतसिंग राजपूत ( चिमठाणे ) व द्वितीय १० , ००० रुपये महेंद्रसिंग गिरासे , प्रदिपसिंग गिरासे ( कढरे ) तीसरे पारितोषिक ५००० रुपये डॉ.संजयसिंग राजपूत असे बक्षीसाचे स्वरुप असून अन्य वैयक्तिक विशेष बक्षीसेही आयोजोकांकडून ठेवण्यात आली आहे या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा असे आवाहन जय बजरंग क्रिकेट क्लब च्या आयोजकांनी केले आहे