दुष्काळातील झळ सोसणार बाभूळफाटा व रोजगाव परिसर



धुळे/गणेश न्याहळदे, खबरबात
 जैताणे गावापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असणारे छोटेसे गाव गावात सर्वांचाच व्यवसाय शेती व मजुरी हाच असून या भागात बाभूळफाटा या परिसरात पाण्याचे साठे हे उपलब्ध नसून प्रत्येक वर्षी पाण्याचा प्रश्न निर्माण होतो शेतीसाठी पुरेशे पाणी याठिकाणी नसल्याने हंगामी स्वरूपाची शेती या भागात होते उन्हाळ्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांना बोअरवेल करण्यासाठी लाखो रुपये खर्च येतो तरीही पाणी मिळतं नाही म्हणून या भागातील शेतकरी हा दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.

कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी 
अनिल सोनवणे शेतकरी, अध्यक्ष कृषि आराधना फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.जैताणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वनराई बंधारे बांधून या समस्येवर उपाय योजना करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु ही समस्या कायम स्वरूपी सोडवणे गरजेचे आहे तरी या भागातील शेतकरी यांनी बाभूळफाटा व परिसरात जलयुक्त शिवार सारख्या महत्वकांक्षी योजना राबविण्यात याव्या अशी मागणी करीत आहेत त्या संदर्भातील लेखी निवेदन देखील मा जिल्हाधिकारी सो धुळे यांना सादर करण्यात येईल अशी माहिती श्री अनिल सोनवणे यांनी दैनिक स्वतंत्र भारत शी बोलतांना दिली शासनाने जलयुक्त शिवार ,नाल्याच्या खोलीकरण ,परिसरातील धरणाचे गाळ काढणे असे पर्याय वापरले तरच या भागातील शेतकरी समृद्ध होईल भीषण दुष्काळात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्ये वर शासनाने व प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे या भागात शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नासल्याने शेतकऱ्यांनी आपल्या जमिन विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे

वनीकरणाचा मोठा भाग या परिसरात आहे.त्यातही तो भाग उंच आहे.त्या भागात मोठे तलाव होवू शकतात. शेतक-यांनी ठिबक व शेततळे अधिक प्रमाणात केलेत तर काही प्रमाणात फरक पडेल.
महेंद्र जाधव शेतकरी

 परिसरात बोअरवेलला पाणीच लागत नाही.बाईचा तलावाची खोलीकरण झाल्यास थेाड्या प्रमाणात फरक पडेल.गोकुळ नालाही तिकडून वाहतो. मागील वर्षी मंजूगुप्ता फाउन्डेशन ने लहान लहान १० बंधारे या परिसरात केलेत.या वर्षी पाऊसच पाहीजे त्या प्रमाणात झाला नाही.त्यामुळे त्यांचाही काही उपयोग झाला नाही. बुराई प्रकल्पातून काही व्यवस्था शासन स्तरावरावर करता येईल का ? शेतकरी समवेत शेतमजूरांवरती रोजगाराचा प्रश्न भेडसावत आहे. या वर्षी उत्पन्न निम्यापेक्षा कमी झाले.
अनिल सोनवणे शेतकरी
अध्यक्ष कृषि आराधना फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.जैताणे