संगिता सोमवंशी (घोगरे) यांना पीएच.डी


नागपूर-  अंशकालीन सहाय्यक प्राध्यापक संगिता सोमवंशी-घोगरे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठातर्फे आचार्य पदवी जाहिर करण्यात आली आहे. त्यांनी समाजशास्त्र या विषयात आपला शोधप्रबंध सादर केला होता. आधुनिकरणाच्या प्रक्रियेत कुणबी जात- एक समाजशास्त्रीय अध्ययन असा शोधप्रबंधाचा विषय होता़  त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ. हेमराज लाड, गुरू डॉ. सुभाष तोष्णीवाल, पती प्रा. राजेश घोगरे तसेच कुटूंबीयांना दिले.