मागासवर्गीय युवकांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा

Image result for मागासवर्गीय युवकांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठाचंद्रपूर/प्रतिनिधी:
इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गातील युवकांना मोठया प्रमाणात स्वयंरोजगाराच्या माध्यमातून व्यवसाय सुरु करण्यात यावा म्हणून 25 हजार रुपयापर्यंत 2 टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ओ.बी.सी.प्रवर्गातील युवक व युवतींना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी व संलग्न व्यवसाय, लघु उद्योग, वाहतुक क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय, तांत्रीक व्यवसाय, पारंपारीक व्यवसाय अथवा सेवा उद्योग सुरु करण्यासाठी स्थानिक राष्ट्रीयकृत बँक व महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून 20 टक्के बिज भांडवल उपलब्ध करुन देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा मिळवून देण्यात येणार आहे. 

तसेच किरकोळ व्यवसाय अथवा अन्य तांत्रीक लघु सेवा उद्योग सुरु करण्यासाठी महामंडळामार्फत 25 हजार रुपयापर्यंत 2 टक्के व्याज दराने थेट कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी 3 वर्षपर्यंत असणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ ओ.बी.सी. प्रवर्गातील युवक व युवतींनी मोठया संख्येने घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.