नागपूर येथे वंचित बहुजन आघाडी अधिवेशणाचे 13 डिसेंबरला आयोजन

चंद्रपुर/प्रतिनिधी :
 वंचित बहूजन आघाडीचे आता पर्यंत तीन अधिवेशने झाली आहेत.सोलापूर, औरंगाबाद आणि पुणे.आता चौथे अधिवेशन नागपूर येथे आयोजित केले आहे. १३ डिसेंबर २०१८रोजी नागपूर येथील कस्तुरचंद पार्कवर जे चौथे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनाला "आर्थिक अधिवेशन "असे नांव दिले आहे.
    बहुजनाना  हक्काचा वाटा म्हणजे आर्थिक वाटा आम्हाला मिळतो का..?आपल्या देशातील ८३टक्के संपत्ती ही १टक्का लोकांच्या ताब्यात आहे ही भयावह आर्थिक दरी कशी व का निर्माण झाली. समतेचं अधिष्ठान असलेल्या संवैधानिक लोकशाहीत हा प्रचंड भेदभाव कसा ऊत्पन्न झाला...??
   आर्थिकदृष्ट्या असमानता ही लाचारीला कवटाळते आणि मग एक घटक दुसऱ्या घटकावर अवलंबून राहू लागतो ही परावलंबी अवस्था घालवायची असेल तर, आर्थिक निधीचे समतेने वाटप झाले पाहिजे ही आपली मागणी असेल. नागपूर येथील आर्थिक अधिवेशनाला उपस्थित राहुन आपणं सर्वांनी आपल्या हक्काच्या पैशाची मागणी केली पाहिजे हा संदेश यापुढे दिला जाईल.म्हणून सर्व वंचित बहूजन समाजातील घटकांनो १३डिसेंबरच्या अधिवेशनाला उपस्थित राहावे असे आव्हाहन चंद्रपुर बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष रामराव चव्हाण,पोम्भूर्णा तालुका अध्यक्ष अतुल वाकड़े यांनी केले आहे.