सिंदेवाहीत अवैध शिकवणी वर्ग


  •  शिकवणी वर्ग कायद्याच्या कक्षेत आणा : नियमाचे आवश्यकता
  • गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे अनेक पक्षाचे निवेदन



 प्रशांत गेडाम/प्रतिनिधी
 सिदेवाही--- तालुक्‍यातील  येथील  मागील वर्षा एका खाजगी शिकवणी घेनार्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने शिकवणी वर्गाच्या विषय आता ऐरणीवर आलेला आहे .या लाजिरवाण्या प्रकरणाने सिदेंवाही  शहरातील शिक्षण क्षेत्र ढवळून निघालेले आहे. या घटनेमुळे पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून  शिक्षणप्रेमी मध्ये चिंता वाढलेले आहे. त्यामुळे आता गल्लीबोळातून चालणाऱ्या अनि्बंध शिकवणी वर्गावर कायद्याचा लगाम कसुन ,या दुकानदार आहेत नियंत्रणात आणावेत अशी मागणी होत आहे.
 अलीकडे शहरात सर्वत्र शिकवणी वर्गाच्या गोरख धंदा जोरात सुरू झालेला असून यावर शासनाचे कोणतेही नियंत्रण दिसत नाही .आपल्या पाल्याच्या उज्वल भवितव्याचे स्वप्न पाहणारे पालक प्रसंगी आपल्या पोटाला चिमटा देऊन त्यांना शिकवणी वर्गात पाठवीत असल्याने पालकांच्या या कमजोरीचा लाभ घेत काही धंदेवाईक शिकवणी चालकांनी आपल्या दुकानदार्‍या राजरोसपणे सुरू केलेले आहेत.

 शहरभर अशा शिकवणी वर्गाना जणू ऊत आले आहे .आपण ज्या शिकवणी वर्गात आपल्या पाल्यांना पाठवितो , तिथे त्यांच्या सुरक्षेच्या काय सुविधा आहेत. याकडे पालकांचे दुर्लक्ष होत आहे. शिकवणीवर्ग घेणारे संचालक केवळ आपल्या आर्थिक लाभ करता पहाटेपासून  तर रात्री उशिरापर्यंत वर्ग चालवतात. त्यामुळे विशेषतः विद्यार्थिनींना आपला जीव धोक्यात घालून अशा वर्गांना हजर राहावे लागते. त्यामुळे प्रत्येक शिकवणी वर्गाची अधिकृत नोंदणी करून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयक खास नियम पाळणाऱ्या शिकवणीवर्गांना शासनाने परवाने द्यावेत. विशेषत: विद्यार्थिनी ची शिकवणी पहाटे सकाळी सात वाजण्यापूर्वी व रात्री सात वाजल्यानंतर शिकवणी वर्ग घेण्यावर कायदेशीर बंदी असावी. वर्गात प्रवेशित मार्गापासून  तर शिकवणी वर्ग चालू असताना . तथा वर्गाच्या आत-बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करावे. शिकवणी वर्गात प्रत्येक  अधिकृत शिक्षकाची यादी फलकावर लावली असावी . व ती नोंद शासन कडे असावी.
 प्रत्येक नोंदीणीकृत शिकवणी वर्गाचे मूल्यमापन होत राहावे .या सोबतच अनेक कठोर  नियम या शिकवणी वर्गांना लावावेत असा सूर शिक्षण क्षेत्र प्रेमी कडुन एेकंाला मिळत आहे.
पालकांनी ही अवेळी चालणाऱ्या अशा वर्गात आपल्या मुलींना पाठवू नयेत , दर महिन्यात शिकवणी वर्ग संचालकाशी संपर्क साधून शिकवणी वर्गातील वातावरण जाणून घ्यायला हवे.  शिकवणी वर्गात उपस्थित राहणार प्रत्येकांची उपस्थिती पत्रक सुरक्षित ठेवणे बंधनकारक करावे . अनुपस्थित विद्यार्थ्यांची अशी सूचना तात्काळ पालकांना दिली जावी .या सोबतच शिकवणी वर्गाच्या दर्शनी भागावर पोलीस विभागाच्या हेल्पलाइन नंबर दिसत राहील. अशा पद्धतीने  लिहिण्यात यावा, अशाप्रकार शिकवणी वर्गावर  नियंत्रण ठेवल्यास जाऊन  अनिष्ट  गोष्टी येऊ टाळता येवु शकतात . शिक्षण प्रेमीे कडुन तसेच पालकवर्गाकडून होत आहे. असा विश्वास व्यक्त करून होत आहे.