वैष्णवधाम येथे महिलांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी


  • डिसेंट फौंडेशन ने केले मोफत सॅनिटरी नॅपकिन चे वाटप

जुन्नर /आनंद कांबळे 

      वैष्णवधाम( ता जुन्नर )येथील काळदेवाडी या आदिवासी व डोंगरी लोकवस्तीत येणेरे च्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने महिलांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी करून, रक्ताच्या जवळपास १५ चाचण्या तपासणी साठी मंचर च्या महालॅब मध्ये पाठवून प्रत्येक माहिलेला एक महिन्याच्या रक्त वाढसाठी लोह युक्त गोळ्या मोफत देण्यात आल्या .       डिसेन्ट फौंडेशन ,पुणे व मार्तंड देवस्थान ट्रस्ट, चिंचोली यांच्या मदतीने *'कळी उमलताना'* ..या उपक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींना वयक्तिक स्वच्छता व आरोग्य या बाबतीत डॉ सौ कल्याणी पुंडे व डॉ सौ राजश्री इंगवले यांनी मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थित ९० महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले.

      या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश गावित ,डिसेन्ट फौंडेशन चे संस्थापक जितेंद्र बिडवई, आरोग्य सहायक डी एम् लांघी ,वैष्णवधाम चे सरपंच सुदाम डेरे , लॅब टेक्निशियन एस एस काळे ,जयेश चव्हाण,पारुंडे विद्यालयाचे पर्यवेक्षक फकीर आतार ,संदिप पानसरे ,विठ्ठलवाडी चे सरपंच आदिनाथ चव्हाण,दगडू पवार , सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार , गणेश पवार, संतोष काशिद ,श्रीमती एस एस भारमळ, अनिता केदार ,तुकाराम केदार ,आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र बिडवाई यांनी सूत्रसंचालन राजेंद्र पवार तर आभार संदिप पानसरे यांनी केले .