केडीके अभियांत्रिकीत १४ व १५ ला आंतरराष्ट्रीय परिषद

नागपूर/प्रतिनिधी:

 नंदनवनस्थित केडीक़े़ अभियांत्रिकी महाविद्यालयात बेसिक सायन्स विभागाच्या वतीने १४ व १५ डिसेंबर रोजी मल्टी डायमेन्शनल रोल आॅफ बेसिक सायन्स इन अडव्हान्स टेक्नॉलॉजी या विषयापर आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे.

या परिषदेच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या विकासातील विज्ञानाचे महत्व लक्षात घेऊन जगभरातील पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र , गणित व इतर शाखातील शास्त्रज्ञ व संशोधकांना एकत्र आणून प्रगती करण्याचा प्रयत्न करण्यात येईल़ या परिषदेत जपानचे प्रो. केनरॅरो नाशिरो (नॅनो टेक्नॉलॉजी / आणि नॅनो मेडिसीन), दक्षिण आफ्रि केतील डॉ. पंत,  क्वालिटी फोटॉनिक्स हैदराबादचे सीईओ के़ विजयकुमार, आयआयटी मुंबईचे प्रो. दत्ता, डॉ. चौरसिया, डॉ. प्रधान, डॉ. संजय ढोबळे, आणि अनेक विद्वानांची उपस्थिती राहणार आहे़ या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नागपूर विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. येवले, विद्यापीठाच्या पदव्युत्तर गणित विभागाचे प्रमुख डॉ. खडेकर यांची उपस्थिती राहील़

या परिषदेला देश विदेशातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, १५० च्यावर रिसर्च पेपर सादरीकरणासाठी व प्रकाशनासाठी आले आहेत. निवडक शोधप्रबंध अमेरिकन इन्स्टिट्यूट आॅफ  फि जिक्स, स्कोपस जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे़ आयोजनाकरिता माजी मंत्री राजेंद्र मूळक, यशराज मूळक, प्रो. डॉ. डी. पी. सिंग, उपप्राचार्य डॉ़ ए़ एम़ बदर यांच्या मार्गदर्शनात तयारी सुरू आहे.