चालक- वाहकच्या दुर्लक्षामुळे दोन बकऱ्या ठार


चिमूर/रोहित रामटेके
चिमूर:- वरोरा कडून चिमुरच्या दिशेने येत असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एस. टी. बस क्रमांक mh 20 d 8550 हि बस चिमुरच्या बस स्थानकाकडे जात असताना बालाजी देवस्थान परिसरात दोन बकऱ्यांना धडक देऊन ठार केल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये एक बकरी जागीच ठार झाली तर दुसरी बकरी गंभीर जखमी झाली आहे.

       बकऱ्या चारून घराकडे संजय चलमेलवार हे आपल्याच बाजूने जात असताना महामंडळाची बस हि पाठीमागून येऊन त्यांच्या बकऱ्यांना धडक दिली व जागीच ठार केले. त्यानंतर चलमेलवार यांनी बस चालकाला आवाज दिला पण बस चालक बस घेऊन स्थानकाच्या दिशेने मोठ्या जोरात निघून गेले. बकरीचे मालक सुरेश देसाई असून त्यांनी आपल्या चार बकऱ्या ह्या फिरोज खान यांना २७,०००/- रुपयाला विकल्या होत्या. फिरोज खान यांनी सुरेश देसाई यांना ९०००/- रुपये अडवांस स्वरूपात दिले होते पण त्या बकऱ्याचा अपघात होऊन जागीच ठार झाल्या. या घटनेने परिसरात लोकांची चर्चा वाढत आहे की, आज त्यांच्या बकऱ्यांचा अपघात बस चालकाच्या असर्कपणामुळे झाला.  पण हाच प्रकार उद्या मोठा अपघात होऊ शकतो.याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.