वाडी बीटस्तरीय शालेय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उदघाटन.



वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे
दवलामेटी येथील जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळेत नागपूर पंचायत समीती अंतर्गत वाडी बीटस्तरीय शालेय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उदघाटन शनिवार १५ डिसेंबर रोजी जि .प. सदस्या प्रणिता कडू यांचे हस्ते व पं.स उपसभापती सुजित नितनवरे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून उपसरपंच गजानन रामेकर , खंड विकास अधिकारी किरण कोवे, गट शिक्षणाधिकारी सुभाष जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती निखारे , बांधकाम अभियंता गुणवंत पंखराज, पंचायत विस्तार अधिकारी दिलीप कुहीटे, शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुनघटकर , गुलाब उमाठे, केंद्रप्रमुख शरद भांडारकर , हेमचंद्र भानारकर, ग्रामविकास अधिकारी विष्णु पोटभरे , सचिव विकास लाडे, श्रीमती नान्हे,विजय पवार प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्वप्रथम माता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर क्रीडा ध्वजारोहण व क्रीडाज्योत प्रज्वलित करून प्रमुख पाहुण्यांना उच्च प्राथमिक शाळा डिफेन्स (हिंदी) यांच्यातर्फे मानवंदना देण्यात आली.
प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुनघटकर ,संचालन आशा दावळे तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक दीपक तिडके यांनी केले.
कार्यक्रमा दरम्यान वाडी व बाजारगाव केंद्रातील सेवा निवृत्त शिक्षक पुरुषोत्तम द्रव्यकर, आनंद घोरपडे, विद्या पेटकर, माया जामनिक, आशा खडगी, उषा मनकवडे, शोभा चिडाम यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी झुम्बा कवायत व दर्शनी समूह नृत्य सादर करण्यात येऊन उपस्थितांचे मनोरंजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक भास्कर क्षीरसागर, प्रकाश कोल्हे,पुरुषोत्तम चिमोटे, रामेश्वर मुसळे, युवराज उमरेडकर, सुदाम नागपुरे, नितीन सरोदे,प्रवीण थेटे, रुपेश भोयर, अनिल गेडाम, टेकाम, राजेश मानकर, प्रकाश धवड, प्रवीण मेश्राम,रंजना काकडे, प्रीती जेठे, कल्पना भुसारी, ज्योती फर्नांडिस, शारदा डोकरीमारे, माया पांडे, जावळकर, घोरमाडे, महल्ले, मौंन्देकर आदींनी सहकार्य केले .