वन राज्यमंत्री अब्रीशरावसाठी वाहतूक कोंडी

वाहतूकीची कोंडी करणाऱ्या भाजप मंत्र्याला शिवसैनिकांनी विचारला जाब

नागपूर -राज्याचे आदिवासी व वन राज्यमंत्री अब्रीशराव आत्राम रामटेकला जात असल्याने मनसर टोल वरती भारतीय जनता पार्टी लिहलेली गाडी उभी करून बराच वेळ वाहतुकीची कोंडी करण्यात आली होती.
राज्यमंत्राची गाडी टोलवर पहुचताच चंद्रपूर शिवसेना उपजिल्हा प्रमुख मनीष जेठानी यांनी टोल नाक्यावर मंत्र्याचा ताफा थांबवुन जाब विचारला या प्रकरणी मंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली
भारतीय जनता पार्टी लिहलेले एम एच ४० ए सी ६५७९ या क्रमांकाची खाजगी गाडी टोलवर उभी करून ता23 रविवारला बराच वेळ वाहतुकीची कोंडी करणयात आली होती. याच मार्गाने प्रवास करणारे शिवशेनेचे मनीष जेठणी यांच्या लक्षात येताच ते आपल्या वाहणातू उतरून थेट उभ्या केलेल्या वाहानजवळ पोहचवून टोल वेवस्थापकाला विचारपूस केली .मंत्री येत असल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अतिउत्साह दाखवीत टोल वर गाडी उभी करून मार्ग अळविला असल्याचे माहीत होतच ,जेठाणी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत राज्य मंत्री आत्राम यांचा ताफा थांबविला .थेट मंत्र्यांना वाहतुकीची कोंडी का केली म्हणून प्रश्नन विचारला यावर कार्यकर्त्याच्या चुकीच्या वर्तवणुकीची मंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली.