आनंद कांबळे यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार

जुन्नर /आनंद कांबळे:
जुन्नर येथील प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आनंद कांबळे यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेच्या वतीने शिर्डी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
कराड अर्बन बँकेचे सुभाषराव जोशी व चेअरमन डाँ.सुभाष एरम यांच्या हस्ते आनंद कांबळे यांना सहपत्नीक शिक्षकरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले.यावेळी आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार ,विकास गवते ,अतुल औटी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आनंद कांबळे यांच्या मुख्याध्यापक कालावधीत शाळेस आय.एस ओ मानांकन,स्वच्छ शाळा पुरस्कार ,उपक्रमशिल शाळा पुरस्कार ,तसेच बाबेल ट्रस्टचा पुरस्कार मिळाला आहे. शाळेचा दर्जा अ असून शाळा सिद्धीत Aग्रेड मिळाली आहे.यापूर्वी आनंद कांबळे यांना विविध सामाजिक ,शैक्षणिक संस्थेकडून सुमारे १४ पुरस्कार मिळाले आहेत.विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.