जुन्नरमध्ये तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवास उत्साहात सुरुवात.

जुन्नर /आनंद कांबळे 

          पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय कला क्रीडा महोत्सव जुन्नरमध्ये आजपासून सुरू झाल्या आहेत.
आजच्या पहिल्या दिवशी मैदानी सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकार घेण्यात आले.यात कबड्डी,खो खो ,लंगडी,धावणे, गोळाफेक,चेंडूफेक,उंच उडी,लांब उडी आदी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
आज पहिल्या दिवशी उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, आशाताई बुचके,शरदराव लेंडे,पंचायत समिती सदस्य नंदाताई बनकर,जीवन शिंदे,दिलीप गांजळे,कृष्णराव मुंढे विद्यालयाचे सचिव देवराम मुंढे ,गटशिक्षण अधिकारी पी.एस .मेमाणे ,विस्तार अधिकारी के.बी.खोडदे,अनिता शिंदे ,सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी,माध्यमिक क्रीडा शिक्षक पंच उपस्थित होते.
मैदानी स्पर्धा दिवसभरात उत्साही वातावरणात पार पडल्या,मैदान निर्मितीसाठी मुख्याध्यापक पोटकुले सर,क्रीडा शिक्षक शेजवळ मॅडम,साबळे सर,शिंगोटे सर यांनी विशेष प्रयत्न केले.
स्पर्धेच्या विजेत्या संघांना पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे यांजकडून ट्रॉफी तर पंचायत समितीच्या वतीने मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले.
संपूर्ण स्पर्धांचे समालोचन आपटाळे विद्यालयाचे शिक्षक लोखंडे सर यांनी उत्तम प्रकारे केले.
पहिल्या दिवसातील स्पर्धा गटशिक्षण अधिकारी पी.एस.मेमाणे यांच्या उत्तम नियोजनाखाली व मार्गदर्शनाखाली पार पडल्या.स्पर्धांचे संयोजन शिक्षण विस्तार अधिकारी के.बी.खोडदे,अनिता शिंदे यांनी उत्तम प्रकारे केले.
जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ,शिक्षक समिती,अखिल शिक्षक संघ या संघटनांच्या वतीने पंचांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. स्पर्धा वेळेत पार पडल्याने सर्व शिक्षकांनी संयोजकांचे आभार मानले.
स्पर्धेच्या पहिल्या दिवसाच्या नियोजनात सर्व केंद्रप्रमुख,विषयतज्ज्ञ,अपंग समावेशीत शिक्षक, अनिल देठे,दीपाली थोरात,प्रवीण घोलप,तोडकरी सर,क्रीडा संघटनेचे राऊत सर,खराडे सर,विनायक खोत सर,विजय घोलप सर,डुंबरे एस.बी, ढमाले सर,व सर्व क्रीडा शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले.
संपन्न झालेल्या या स्पर्धांमधील प्रथम क्रमांक पुढीलप्रमाणे : 50 मीटर धावणे स्पर्धेत - जमीर अकबर शेख ,शाळा धनगरवाडी,स्नेहा चंद्रकांत केदार ,शाळा आलमे यांचा प्रथम क्रमांक आला आहे.

100 मीटर धावणे स्पर्धेत - आदित्य दिलीप कुमकर, शाळा पिंपळगांव जोगा,सारिका रवींद्र गाडगे,शाळा,साकोरी यांनी प्रथम क्रमांक मिळवले आहेत.

चेंडूफेक स्पर्धेत - बजरंग रामजन गौतमे शाळा,बागलोहरे,आणि खुशबू मटरू रॉय शाळा नं.2 नारायणगाव,यांनी प्रथम क्रमांक मिळवले आहेत.

गोळाफेक स्पर्धेत - आदित्य दिलीप कुमकर ,शाळा पिंपळगावजोगा,सानिका रवींद्र भुजबळ ,शाळा आनंदवाडी यांनी प्रथम क्रमांक मिळवले आहेत

उभी उंच उडी स्पर्धेमध्ये सुजल भाऊसाहेब खिलारी शाळा शिंदे आणि रविना मनोहर बांडे शाळा राजूर नंबर एक यांचा प्रथम क्रमांक आला आहे.

धावती उंच उडी स्पर्धेत रोशन लक्ष्मण मोघे शाळा ठाकरवाडी आणि शुभांगी चंद्रकांत माळी शाळा गोळेगाव यांचे प्रथम क्रमांक आले आहेत.

लांब उडी स्पर्धेत आदित्य दिलीप कुमकर शाळा पिंपळगाव जोगा आणि आकांक्षा संतोष हांडे शाळा पिंपळगाव जोगा यांचा प्रथम क्रमांक आला आहे.

लांब उडी स्पर्धेत प्रेम गुलाब म्हस्के शाळा नगदवाडी आणि साक्षी कैलास सोलाट शाळा गुंजाळवाडी यांचा प्रथम क्रमांक आला आहे.

मुलांच्या कबड्डी स्पर्धेत पिंपळगाव जोगा शाळेतील मुले तर उच्छिल शाळेतील मुलींचा प्रथम क्रमांक आला
खो खो स्पर्धेत धनगरवाडी शाळेतील मुले आणि मुलींनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.

लंगडी स्पर्धेत गुंजाळवाडी शाळेतील मुलांनी आणि मुलींनी प्रथम क्रमांक मिळविला आहे