डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली

चिमूर/ रोहित रामटेके:

भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनव निमित्त अभिवादन कार्यक्रमात भाजप तालुका अध्यक्ष डॉ दिलीप शीवरकर  ,महिला तालुका अध्यक्ष गीता लिंगायत ,भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाडे ,नप गट नेते छाया कनचलवार , आशा मेश्राम ,जयंत गौरकर विनोद अढाल , नगरसेवक संजय खाटीक ,विकी कोरेकर , सूरज नरुले ,सुभाष बैंलनवार , समद बाबू,सुधीर राऊत , डाहुले ,झिरे संजय कुंभारे  प्रिया जयकर मनीषा कावरे आदी उपस्थित होते.
 यावेळी डॉ दिलीप शिवरकर म्हणाले की  भारत रत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश दिला असून देशाला सर्वांगीण विकासासाठी घटना निर्माण केली भाजप च्या शासन काळात दिलेल्या घटनेचे विश्लेषण करून गोर गरीब जनतेच्या विकासासाठी  योजना आखल्या जात आहे आंबेडकरी जनतेचा ओघ भाजप वळत असून प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले संचालन जयंत गौरकर यांनी केले डॉ बाबासाहेब आंबेडकर अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या.