प्रत्येक तालुकास्तरावर घेतली जाणार परिक्षा


मिशन सेवासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा उदयाचा शेवटचा दिवस

चंद्रपूर दि.18 डिसेंबर : राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी नोकरीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मुलांचा टक्का वाढावा यासाठी सुरू केलेल्या मिशन सेवा अभियानाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी चंद्रपूर जिल्हयातील चंद्रपूर, राजूरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर, गोंडपिपरी, पोंभूर्णा, सावली, मुल, सिंदेवाही, ब्रम्हपूरी, नागभिड, चिमूर, वरोरा, भद्रावती या सर्व तालुक्याच्या ठिकांच्या मुलांनी आपल्या नावांची नोंदणी केलेल्या त्या त्या तालुक्यामधील नांव नोंदणी करणा-या विद्यार्थ्यांची परिक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत 23 डिसेंबरला होणाऱ्या सराव ऑनलाईन नोंदणीची परीक्षेसाठी मोठ्या संख्येने ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुशिक्षित बेरोजगार युवकांकडून केल्या जात आहे. पहिल्या तीन दिवसातच जिल्ह्यातील शेकडो युवकांनी आपली नोंदणी केली आहे.
20 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. मिशन सेवांतर्गत राज्य शासनामार्फत होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये तज्ञांचे मार्गदर्शनप्रशिक्षण तसेच आवश्यक अभ्यास साहित्याचे वाटपही या योजनेमध्ये केले जाणार आहे. तथापिया योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता जिल्ह्यातील परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या युवकांना एमपीएसी पूर्व परिक्षेचे सराव परिक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे.
यासाठी chanda.nic.in या संकेत स्थळावर भेट देणे आवश्यक आहे. याशिवाय हॅलो चांदा या मोबाईल प वर देखील याबाबत लिंक देण्यात आली आहे. या सराव परीक्षा सत्रातील पहिली परीक्षा ही 23 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये घेण्यात येईल. सदर परीक्षेचे प्रश्न संच हे पुणे येथील नामवंत संस्थेमार्फत तयार करण्यात आले असून हे सत्र विद्यार्थ्यांकरिता पूर्णपणे विनामूल्य राहील. अश्या प्रकारच्या सत्राचे आयोजन पुढे ही प्रत्येक रविवारी करण्यात येईल. परीक्षा संपल्यानंतर लगेच प्रश्नपत्रिकाचे उत्तरांच्या अनुषंगाने व्हीडिओच्या साहाय्याने तज्ज्ञांकडून विश्लेषण करण्यात येईल. या संबंधित भविष्यातील पुढील माहिती करीता इच्छुक विद्यार्थ्यांनी chanda.nic.in या संकेतस्थळास वारंवार भेट द्यावी. नोंदणी करण्यात आलेल्या या मुलांना परीक्षांबाबत, तसेच या अभियानातील वेगवेगळया उपक्रमाबाबत माहिती दिली जाणार आहे. नोंदणी करण्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर असल्यामुळे मेगा भरती मध्ये परीक्षेस बसण्यास इच्छुक असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी याबाबत तातडीने प्रतिसाद द्यावा असे आवाहन मिशन सेवा परीक्षेच्या समन्वयक व पालकमंत्री इंटर्न स्नेहा मेघावत यांनी केले आहे.