सिलिंडरने केली हजारी पार

ग्रामीण भागात स्वयंपाक पुन्हा चुलीवर! 

उज्ज्वलाने आणले गृहिणींच्या डोळ्यात पाणी



पवनी/भंडारा
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र शासनाने उज्ज्वल योजनेअंतर्गत खेड्यापाड्याती प्रत्येक कुंटूबाला अनुदानावर गॅस उपल्ब्ध करुन दिला खरा,मात्र सिंलेंडरने हजारी पार केल्याने ग्रामस्थांना खरेदी करणे शक्य नाही, परिणामी महिलांना पुन्हा चुलीवर स्ययंपाक  करावा लागत असल्याने डोळ्यात  पाणी आले आहे, चुलीवर स्वयंपाक केल्यास महिलांना श्वास नाचे व डोळ्यांचे आजार जडतात, वायू प्रदूषण होते पर्यावरणाचा समतोल राखता यावे आदी कारणे पुढे करून केंद्र शासनाने उज्ज्वल योजनेच्या माध्यमातून खेड्यापाड्यात गोरगरीब नागंरीकाना अनुदानावरच गॅस उपल्ब्ध करुन दिला ते गॅस कनेक्शन जवळपा मोफतच उपलब्ध होत असल्याने जवळपास सर्वानीच गॅस सिलिंडर खरेदी केला, त्या माध्यमातून केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात आपुलकीही मिंळवली, मात्र वाढत्या गॅस सिलेंडरच्या दरामुळे ग्रामीण जनता मेटाकुटीस आली आहे,  हातावर आणून पानावर खाणारे रोजंदारी वर काम करणाऱ्यांंना एका वेळेस एक हजार रुपये।  देऊन गॅस सिलेंडर खरेदी करणे शक्य नसल्यामुळे पुन्हा चुलीवर स्वयंपाक केला जात असल्याने चित्र सर्वत्र पाहवयास मिळत आहे ,परिणामी चूलयुक्त ग्रामीण या शासनाच्या निर्धारावर पूर्णत :पाणी फेरलले जात आहे, अनं वस्त्र निवारा याकडे प्राथमिक गरजा म्हणून पाहिले जात होते, त्यात आला घरगुती गॅस सिलिंडरची भर पडली आहे, आगदी डोक्यावर गवताचे छप्पर असेल त्याच्याही घरात उज्ज्वच्या माध्यमातून गॅस सिलिंडर दिसु लागले होते ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यासाठी
शासन योग्य पाऊल ऊचलून सुरुवातीला वाहवाही लूटली असली तरी भाव वाढ रोखू न शकल्याने ते ग्रामस्थ आता बोट मोडू लागली आहेत, !!!


जीवनमान उंचाविनाच्या नांदात शासनाने गॅस सिलेंडरची खैराता वाटून भाववाढ केल्यामुळे ग्रामीण  भागात घरातील एका कोपर्‍यात गॅस सिलेंडर ठेवण्यात येवून चुलीवर स्वयंपाक सुरू झाला आहे,प्रपर्यावरणाची काळजी असल्यास शासनाने यावर त्वरीत उपाययोजना करावी.
 शंकरराव तेलमासरे राष्ट्रीय कॉग्रेस तालुका अध्यक्ष पवनी!!!