शेळी राखणदाराचा खून


वरोरा (तालुका प्रतिनिधी)शहरालगत असलेल्या फुकट नगर येथे शुल्लक वादावरून खून झाल्याची घटना घडली असून इंदिरानगर या भागातील हे दोन्हीही रहिवाशी आहेत .या भागात झोपडपट्टीत राहणारे नामदेव गोविंद रागीट वय 55 वर्षे याचा जागेवरच मृत्यू झाला. नामदेव रागीट हे शेळ्या राखण्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून या भागात करत होते. रोजप्रमाणे सकाळी 10.00वाजताच्या सूमारास शेळ्या घेऊन चरण्यासाठी जात असताना तिथेच राहणाऱ्या शैलेश चिकाटे यांच्या घराजवळ ही घटना घडली. या रोड वरून नामदेव रोज आपल्या शेळ्या चरण्यासाठी घेऊन जात असताना या शेळ्या आजूबाजूचे कुंपण त्यामधील झाडेसुद्धा खात होती. त्यामुळे शैलेश मी लावलेले झाडेसुद्धा ह्या बकऱ्या रोज खात होत्या याचाच राग येऊन काही वेळा यांचे वाद निर्माण झाले होते. परंतु आज शेळ्यांनी शैलेश चिकाटे यांनी लावलेले फुल झाडे व मैदीचे झाड खाल्ल्याने वाद सुरू झाला. शैलेश यांचा राग अनावर झाल्यानंतर त्याने त्याच ठिकाणी असलेल्या लोखंडी सबलेने नामदेव यांच्या डोक्यावर वार केला यामध्ये नामदेव जागेवरच मृत्युमुखी पडला.वाद सोडवण्याच्या अगोदरच नामदेव यांचा मृत्यू घटनास्थळीझाला . त्यामुळे या परिसरात शोकाकुल वातावरण पसरले असून आरोपीने स्वतःच पोलीस स्टेशन वरोरा येथे पोहोचून सरेंडर केले.
नामदेव यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे शवविच्छेदनासाठी नेला असून पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहे.