कुही व भिवापुर तालुक्यातील मिरची पिक नामशेष होण्याच्या मार्गावर


वेलतुर- सद्या स्थीत तिन हजार तिनशे हेक्टरमध्ये मिरची पिकाची लागवड केली आहे मिरची पिक हे शेतकऱ्यांना साठी नगदी पिक म्हणून गणल्या जाते यावर्षी सुरवातीला च चुरडा रोगाने ग्रासल्याने मिरची पिकावर औषधी मारता मारता शेतकऱ्यांना च्या नाकीनऊ आले त्यात शेतकऱ्यांने तळहातावरच्या जखमेला सांभाळावे तसे सांभाळून संगोपन केले व मिरची पिकाला सांभाळले व आता कशे बशे झालेले मिरचीचे पिक तोडून विकण्याची वेळ आली असता मिरचीला प्रती कीलो सहा रुपये भाव मिळत आहे मिरची तोडणी साठी दिडशे रुपये लागतात तर त्याचि किंमत दोनशे रुपये मिळते आज घडीला एक एकर शेतामध्ये मिरची लागवड व संगोपनाचा खर्च चाळीस हजार रुपये होउन गेला आहे व आता मिरचीला सहा रुपये कीलो भाव असल्याने तालुक्यातील शेतकरी लाखो रुपयाने कर्ज बाजारी होनार मात्र त्यासाठी तालुक्यातील नेते काही प्रयत्न करतिल की झोपेचे सोंग घेवुन चिडीचिप राहतिल अशी परीसरातील शेतकऱ्यांना मध्ये नेते आमचा पन पाहतो का? अशी खमंग चविने चर्चा करीत आहेत

काही प्रगतशील शेतकऱ्यांना बोलके केले असता त्यांनी सांगितले आपल्या तालुक्यात नेत्यांची कमीच आहे कारण काटोल नरखेड सावनेर या तालुक्याची आर्थिक मदार संत्रा व मोसंबी या पिकावर अवलंबून असल्याने त्यांची मुख्य पिकात गनना होउन हमी भाव नुकसान भरपाई पिक विमा दिला जातो परंतु भिवापुरव कुही तालुक्याची आर्थिक मदार या मिरची पिकावर अवलंबून असतांना या पिकाला सावनेर काटोल नरखेड तालुक्याच्या धर्तीवर आधार भुत बाजार भाव नुकसान भरपाई पिकविमा का देण्यात येवु नये असा प्रश्न नागपूर जिल्हा कांग्रेस महासचिव राजानंद कावळे यांनी उपस्थित केला

नागपूर जिल्ह्यातील भिवापुरी मिरची ही देशाच्या पटलावर बँटेड म्हणून गणल्या जाते मिरची या पिकांचे रोजच्या जेवनात अन्यन्य महत्त्व आहे हे तर सगळ्यांना माहीतच आहे

मिरची पिकाची अशीच अवस्था राहीली तर देशाच्या पटलावर असलेल्या भिवापुरी मिरचीचे ंनाव पुसल्या गेल्या शिवाय राहानार नाही व त्याच बरोबर दोन्ही तालुक्यातील मिरची लागवड नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही अशी भिती सुजाण नागरिकांनी व्यक्त केली