नागपूरचा वीज पुरवठा बुधवारी बंद राहणार

नागपूर/प्रतिनिधी:
नियमित देखभाल- दुरुस्तीसोबतच मेट्रो रेल्वेच्या कामासाठी बुधवार दिनांक १२ डिसेंबर २०१८ रोजी महावितरणच्या काँग्रेस नगर विभागातील धंतोली, खामला, सुरेंद्र नगर, कर्वे नगर येथील वीज पुरवठा वेगवेगळ्या वेळेत बंद राहणार आहे. 

सकाळची ९ ते ११ या वेळेत अजनी रेल्वे स्टेशन, ऑल इंडिया रिपोर्टर, छोटी धंतोली, सकाळी ९ ते १२ या वेळेत सावरकर नगर, दंतेश्वरी, देव नगर, सुरेंद्र नगर, संताजी कॉलेज परिसर, विकास नगर, कन्नमवार नगर, कर्वे नगर, उज्वल नगर येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी १० ते ११ यावेळेत झाशी राणी चौक परिसर, विद्यापीठ ग्रंथालय परिसर, सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत विद्यापीठ परिसर, अंबाझरी उद्यान परिसर, वर्मा ले आऊट, पांढराबोडी परिसर, शंकर नगर, खरे टाउन, भगवाघर, नागपूर नागरिक हॉस्पिटल परिसर, सुजाता ले आऊट, आझाद हिंद ले आऊट, जीवन छाया सोसायटी, स्वावलंबी नगर, इंद्रप्रस्थ नगर, टेलिकॉम नगर, रवींद्र नगर, शास्त्री ले आऊट, खामला सिंधी कॉलनी, लोखंडे नगर, पठाण ले आऊट, कामगार कॉलनी, बंडू सोनी ले आऊट, चंदनशेष नगर, कृष्णन नगरी, नरसाळा येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी १० ते दुपारी ४ वेळेत खरबी येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ९ ते १० या वेळेत बाल जगत, लक्ष्मी नगर,निरी रोड येथील वीज पुरवठा बंद राहील.वीज ग्राहकांच्या सोयीसाठी वीज पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.