22 जानेवारीला ओवेसी,प्रकाश आंबेडकर चंद्रपुरात

चंद्रपूर/प्रतिनिधी:

वंचित बहुजन आघाडीची स्थापना केल्यानंतर भारीपचे प्रमुख अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी पहिल्यांदाच चंद्रपुरात येत आहेत. 22 जानेवारीला येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्ता संपादन निर्धार मेळाव्याला ते संबोधीत करतील.  
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेत पक्षापक्षांतर राजकीय हालचालींना सुरवात झाली आहे.अश्यातच वंचित बहुजन आघाडीची स्थापना केल्यानंतर २२ जानेवारीला पहिल्यांदाच एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी व भारीपचे प्रमुख अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर चंद्रपुरात येणार आहेत.येत्या २२ जानेवारीला
चंद्रपूर शहरातील स्वावलंबीनगर येथे 22 जानेवारीला सत्ता संपादन निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हे दोन्ही उपस्थित असतील.