वाडीत चलो पंचायत अभियानची सुरवात

नागपूर / अरुण कराळे:

येथील दत्तवाडीतील हरिओम सोसायटी मधून शुक्रवार १८ जानेवारी रोजी चलो पंचायत अभियानाला नागपुर जिल्हा ग्रामिण प्रभारी सागर देशमुख व हिंगणा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अशविन बैस यांच्या नेतृत्वात सुरुवात करण्यात आली . या अभियानाच्या माध्यमातून २५ वार्डातील युवकांकडुन युवा बेरोजगारी कार्ड भरून घेणे , प्रत्येक चौकात मार्गदर्शन शिबीर आयोजीत करणे , भाजपा सरकारने २०१४ मध्ये जे आश्वासन दिले त्याची पडताळणी करणे , दिलेले आश्वासन पूर्ण का केले नाही याची समीक्षा करुन युवकांना जागृत करणे , शेतकऱ्यांना किसान कार्डचे वाटप करणे, नोकरी विषयी माहिती देणे आदीची माहीती युवकांपर्यंत पोहचविणार आहे .

 यावेळी मिथुन वायकर,पियुश बांते,निकेश भागवतकर,हिमांशु बावने,शुभम बघेले,गणेश बावने,इशान जंगले,सागर बैस,जितेश घानेकर,अक्षय व्यापारी,शशी तिवारी,लकी मेशाम,लकी पैसाडेली,अमय सरोदे,गोकुल जुमनाके,रोहित रेवतकर,भोजराज बांरगे,अनूप चरभे,तनवीर रंगारी,रितेश डगारे,सुनील मडावी,रितिक बन्सोड,हर्ष वैदय ,मयंक पेंडाम,विनय रायबोले,बादल सोमकुवर,निशांत,किरमे,रोहित पारदी,तेजस कावरे,प्रितम बेरा,क्षितिज भौतकर,निलेश झाडे,राहुल मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते .