वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

चंद्रपूर/प्रतिनिधी:

चंद्रपूर जिल्ह्यात अलिकडच्या काळात वाघ बिबट्याचा मानवी वस्तीतील संचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. आज पुन्हा एकदा वाघाने शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार केले आहे. हि घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा या गावात घडली आहे.दिवाकर बाबुराव गेडाम असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
आज सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास हळदा गावालगत शेतात दिवाकर गेडाम हे काम करीत होते. मात्र त्याच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांचावर हल्ला चढविला.यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेमुळे हळदा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.