भारिपच्या महिला धडकल्या नगर परिषदवर

मुख्यधिकारी यांना दिले निवेदन नवनीतनगरच्या समस्या आवासून उभ्या 
नागपूर /अरुण कराळे:

वाडी नगर परिषद अतंर्गत असणाऱ्या नवनीतनगर मधील वार्ड क्रमांक १९ व २० मध्ये अनेक समस्यांनी तोंड वर केले असुन त्या समस्या सोडविण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या वाडी महिला आघाडीने भारीप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष अतुल शेंडे यांच्या नेतृत्वात बुधवार १६ जानेवारी रोजी वाडी नगर परिषद कार्यालयावर धडकल्या . 
नवनीतनगर मधील सांडपाणी रस्त्यावर आल्यामुळे डुकरांचा संचार वाढला आहे . या अगोदर नगर परिषद मध्ये निवेदन देऊन डूकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानीक नागरीकांनी केली होती तरीही त्यावर कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही . नवनीतनगर मध्ये तीन दिवस अगोदर पाहूणी म्हणून आलेल्या महिलेला डुकरांनी लचका तोडल्याची माहीती सरिता मून यांनी दिली . 
नवनीत नगरमध्ये सहा महीन्यापूर्वी डुकरांच्या दुर्गंधीमुळे वेदांत रामटेके, उदाराम कळसकर यांचे स्वाइन फ्लूमुळे निधन झाले .
नवनीत नगर मध्ये सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्या नसल्यामुळे जागोजागी पाणी जमा होत असल्यामुळे स्थानीक नागरीकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे .बौद्ध विहार पासून घोडेश्वर यांच्या घरापर्यत नालीचे काम पूर्ण करणे आदी मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी राजेश भगत व नगराध्यक्ष प्रेम झाडे यांना दिले . जर समस्या सुटल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातुन दिला .यावेळी भारीप तालुकाध्यक्ष अतुल शेंडे,वाडी महीला शहराध्यक्ष लताताई महेसकर,महानंदा राऊत ,कांता घागरे, अरुणा निखारे,विशाखा तेलंग,रुपाली बावने, सरिता मून,लक्ष्मी मोहोड ,सिनोद प्रासाद,मुकुंद शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते