खटाव माण अँग्रोचा गणराज्य दिनी पेटणार बॉयलर


 चेअरमन प्रभाकर घार्गे,को-चेअरमन मनोज घोरपडे

मायणी :- ता.खटाव जि.सातारा (सतीश डोंगरे)

         येथील खटाव माण तालुका अँग्रो प्रो लि पडळ या साखर कारखान्याचा प्रथमच सन २०१८-१९ या पहिल्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज शनिवार दि २६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता कारखान्याचे चेअरमन ,माजी आमदार प्रभाकर घार्गे ,को- चेअरमन मनोज घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थित कारखाना कार्यस्थळावर पार पडणार आहे.

          

         खटाव - माण या कायम दुष्काळी तालुक्यात साखर कारखान्याचे दिवास्वप्न प्रत्येक्षात उभा राहत आहे या कारखान्यामुळे शेकडो जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून यामुळे भागातील जनतेत आनंदाचे वातावरण आहे . संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या खटाव माण अँग्रो साखर कारखान्याचा पहिलाच बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ यामुळे भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान नक्कीच उंचावणार आहे.              

          सदर कार्यक्रमास कारखान्याचे सर्व संचालक मंडळ ,सांस्कृतिक,राजकीय,शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे ,टेक्निकल डायरेक्ट बालाजी जाधव  यांनी केले आहे.