संगमनेर;भीषण अपघातात दोघाचा जागीच मृत्यू

विष्णू तळपाडे:अकोले(अहमदनगर):
दि.१८जाने२०१९ लग्नासाठी पुण्याला जाणाऱ्या नाशिक येथील संत्रास व वाळेकर कुंटुंबीयांच्या कारला संगमनेर नजीक मालपाणी पार्किग गेट जवळ स्विफ्ट कारचा सकाळी ७:५७वाजता भीषण अपघात झाला.महामार्गावर मालट्रकला कार धडकल्याने दोन जण जागीच ठार झाले,तर४जण गंभीर जखमी झाले आहेत.मृतांनमध्ये पिंपळगाव बसवंत येथील तरुण व नाशिक येथील मुलाचा तर जखमीन मध्ये ३महिलाचा समावेश आहे.अपघात इतका भीषण होता की,कारचालकास पत्रा कापून बाहेर काढावे लागले.
नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू 4 गंभीर
                            अधिक माहिती अशी की,नाशिक येथील जयंतराव श्यामसुंदर सांत्रास हे नाशिक महापालिकेच्या अग्नीशमन विभागात सेवेत आहेत.त्याची  बहिण उर्मिला सरडे ह्या पुण्यात राहतात,त्याच्या मुलीचे शनिवार दि.१९ रोजी लग्न असल्याने जयंतराव सांत्रास त्यांच्या पत्नी मोहिनी,मुलगा आर्यन तिघेही राहणार नाशिक शिंगाडा तलाव सारडा सर्कल-नाशिक येथील असून मुलगी देवयानी वाळेकर,जावाई भुषण वाळेकर रा.पिंपळगाव बसवंत आणि सासू उषा शरद लोहारकर हे सर्व स्विफ्ट कारने(MH15-DS-7665)शुक्रवारी सकाळी नाशिकहुन पुण्याकडे निघाले होते.संगमनेर शहराजवळ मालपाणी स्कवेअर जवळ मालट्रक GJ06Y8386 ही वळण घेत असताना कारने जोराची धडक देत धक्कादायक अपघात घडला.