२१ जानेवारी:चंद्रपूर येथे ड्रग्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

पटेल हायस्कूल अँल्युमनी फाऊंडेशन चंद्रपूर तथा स्व.प्रभाताई 
जोरगेवार चँरिटेबल टस्ट, चंद्रपूर द्वारा आयोजित 
चंद्रपुर/प्रतिनिधी:

पटेल हायस्कूल अँल्युमनी फाऊंडेशन चंद्रपूर व स्व .प्रभाताई जोरगेवार चँरिटेबल टस्ट चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय तथा महाविद्यायीन विद्यार्थी बांधवांवर होत असलेल्या ड्रग्स नावाच्या महा भयंकर राक्षसाबद्दल जनजागृती करण्यासाठी सोमवार दिनांक २१ जानेवरी २०१९ रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह येथे चंद्रपूर विद्यार्थी -शिक्षक -पालकांसाठी कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन स्व.प्रभाताई जोरगेवार चँरिटेबल टस्ट , चंद्रपूरचे अध्यक्ष किशोर जोरगेवार राहणार आहे. तर कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या तथा मार्गदर्शिका म्हणुन डॉ. सुप्रिया देशमुख राहणार आहे. तसेच विशेष उपस्थिती डॉ .बालमुकुंद पालीवाल राहणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पटेल हायस्कूल अँल्युमनी फाऊंडेशन,चंद्रपूरचे अश्विन वसंत मुसळे राहणार आहे. 
होऊ घातलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्देश विद्यार्थी (माध्यमिक , उच्च माध्यमिक) यांना ड्रग्स संबंधीत इतंभुत माहिती , दुष्परिणाम व सतर्कतेचा इशारा समजावून सांगणे, शिक्षकांना विद्यार्थी वर्गाला ड्रग्सची लागण होण्यामागची कारणे व त्यासाठी त्यांना घ्यावयाची दक्षता व ड्रग्स पिढीत विद्यार्थी वर्गाला हाताडण्याची पद्धत याबाबत मार्गदर्शन, पालक वर्गाच्या पाल्याकडे होणाया दुर्लक्षित पणामुळे विद्यार्थी ड्रग्सच्या आहारी जात असल्यास त्यात आढळून येणारी लक्षणे ओढखावयाची पद्धत व त्यासाठी करावयाचे उपाय यासंबंधी सखोल मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या तथा मार्गदर्शिका डॉ .सुप्रिया देशमुख मार्गदर्शन करणार आहे. 
तरी अशा हा महत्वपूर्ण कार्यक्रमास समस्त विद्यार्थी - शिक्षक - पालक वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पटेल हायस्कूल अँल्युमनी फाऊंडेशन, चंद्रपूर तथा स्व.प्रभाताई जोरगेवार चँरिटेबल टस्ट,चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.