वाडीत एकाच रात्री तीन दुकानात चोरी

चार चोर सीसीटीवी मध्ये कैद 
 अरूण कराळे /नागपूर

वाडीत चोरी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन रात्रभर पोलिसांची गस्त असुनही चोर मात्र चोरी करून पोलीसांच्या हातावर तुरी देत आहे . शनिवार ५ जानेवारी रोजी शिला कॉम्प्लेक्स तवक्कल लेआउट मधील तीन दुकाने चोरांनी साफ केले आहे . 
त्यामध्ये सिद्धार्थ टेलीकॉम सेंटर,लाल साई इलेक्ट्रिक व सुनीता डेली नीड्स या दुकानाचा समावेश आहे . प्राप्त माहीतीनुसार नवनीत नगर ,वाडी निवासी मनोज गजभये यांचे सिद्धार्थ टेलीकॉम मधून २ हजार रुपये नगदी,नोकिया कंपनीचे ३ मोबाइल ,सैमसंग १ मोबाइल ,लिनीयो कंपनीचे २ मोबाइल चोरीला गेले .आशुतोष बर्वे यांच्या डेली नीड्स मधून ३०० रुपये व श्रीखंडाचे मोठे ३ डब्बे चोरीला गेले .
जरीपटका नागपुर निवासी वीरभान किसनचन्द चलवानी यांच्या इलेक्ट्रिकच्या दुकानातून ४५०० रुपये रोख व इतर इलेक्ट्रीकचे सामान असे एकुण ११३०० रुपयाचे सामान चोरीला गेले . अज्ञात चोरांनी दुकानाचे शटर सब्बल ने तोडून दुकानातील माल साफ केला . येथील दुकानातील सीसीटीवी मध्ये चार चोर कैद असल्याची माहीती मनोज गजभिये यांनी दिली आहे .वाडी पोलीसांना याची माहीती रविवारी सकाळी ७ वाजता मिळताच पोलीस उपनिरीक्षक एस . एस .कावनपुरे हे घटनास्थळी पोहचले व तीनही दुकानाचा पंचनामा केला . अज्ञान आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे .सीसीटीवीच्या पुटेज वरुन आरोपीला अटक होणार असल्याचे समजते .