बुधवारी नागपूरच्या या भागाचा वीज पुरवठा राहणार बंद

नागपूर/प्रतीनिधी:

अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी तसेच मेट्रो रेल्वेच्याकामासाठी बुधवार दिनांक २३ जानेवारी रोजी धंतोली,काँग्रेसनगरसह काही भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत दीनदयाल नगर,पडोळे नगर,नवनिर्माण कॉलनी,मॉर्डन सोसायटी,प्रताप नगर,विद्या विहार,गोपाळ नगर,गिट्टीखदान ले आऊट, पठाण ले आऊट, कामगार नगर,बंडू सोनी ले आऊट, कॉसमॉस टाउन, भेंडे ले आऊट, इंद्रप्रस्थ ले आऊट, पाटील ले आऊट, राऊत वाडी,मनीष ले आऊट, पन्नास ले आऊट, प्रज्ञा ले आऊट, दुर्गंधामना,सुराबर्डी,वडधामना, मालवीय नगर,पांडे ले आऊट, योगक्षेम ले आऊट, स्नेह नगर, सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हुडकेश्वर, राजेश्वर नगर,चंदनशेष नगर,कृष्णन नगरी,नरसाळा,त्रिमूर्ती नगर,खामला, अग्ने ले आऊट,आदिवासी सोसायटी,त्रिशरण नगर,अशोक कॉलनी, रामनगर,बाजीप्रभू चौक,हिलटॉप,मुंजेबाबा आश्रम,वर्मा ले आऊट, सुदामनगरी,उज्वल सोसायटी,गोंड बस्ती येथील वीज पुरवठा बंद राहील. 

पहाटे ६ ते दुपारी १ य वेळेत काँग्रेस नगर,धंतोली,छोटी धंतोली,अजनी रेल्वे स्टेशन,मेडिकल कॉलनी येथील वीज पुरवठा मेट्रो रेल्वेच्या कामासाठी बंद राहणार आहे. 
सकाळी ९ ते दुपारी १ या वेळात राजापेठ,विठ्ठलवाडी,नवीन नरसाळा,सकाळी १० ते १२ या वेळात डॉ. आंबेडकर कॉलेज परिसर,सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळात आठ रस्ता चौक परिसरयेथील वीज पुरवठा बंद राहणार आहे.