वाडी नगर परिषदच्या सफाई कर्मचाऱ्यांना उपयोगी साहीत्याचे वाटप

युवक काँग्रेसचा स्त्युत्य उपक्रम 
११० गरजुंना मिळाला लाभ 
अरूण कराळे/नागपूर:

येथील युवक काँग्रेसतर्फे हिंगणा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाडी नगर परिषद मधील सफाई कर्मचाऱ्यांना शुक्रवार ११ जानेवारी रोजी थंडीचे हात मोजे , उपयोगी साहीत्य ,भेटवस्तु व मिठाईचे वाटप करण्यात आले . साफ सफाई करतांना आरोग्याची काळजी घेऊन कर्मचाऱ्यांनी स्वतःची सुरक्षा करावी असे आवाहन अश्विन बैस यांनी केले.

.९५ महीला ,पुरुष कर्मचारी , व वाडी बाजार परिसरात हातमजुरी व हातठेला ओढणाऱ्या १५ मजुरांना हातमोजे वितरीत करण्यात आले . या मानवी सहकार्याबद्दल युवक काँग्रेस व अश्विन बैस यांचे उपस्थितांनी आभार मानले .यावेळी वाडी शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष शैलेश थोराने ,पुरुषोत्तम लिचडे , योगेश कुमकुमवार , संजय जिवनकर , निशांत भगत , मिथुन वायकर ,निकेश भागवतकर,इशांत जंगले ,सागर बैस , पंकज फलके, पियुष बांते , अभिनव वड्डेवार, मंगेश राजपूत ,आकाश अभलंकर,हिमांशू बावणे,रोहन नागपूरकर,शुभम पिंपळशेंडे, अनिकेत तितरमारे ,शैलेश मेश्राम ,सुमित ठाकूर , पंकज तिडके , अरविंद शेडगे , गोलू राजपूत , अक्षय व्यापारी , गोकुळ जमनाडे ,आदी उपस्थित होते .