कर्मचाऱ्यांनी सुंदर व स्वच्छ शौचालय स्पर्धेकरिता काम करावे

 नम्रता राऊत, सभापती, पं स नागपूर 

नागपूर- पंचायत समिती नागपूर(ग्रा) चे प्रांगणात 70व्या प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण समारंभ प्रसंगी केलेल्या छोटेखानी भाषणातून पं स नागपूर च्या सभापती नम्रता राऊत यांनी सुंदर व स्वच्छ शौचालय स्पर्धेत नागपूर तालुका आघाडीवर राहण्याचे दृष्टीने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यभावनेने काम करुन जिल्ह्यात आपला तालुका प्रथम आणण्याचे आवाहन केले.

सर्वप्रथम पं स कार्यालयातील तिरंगी झेंड्याचे समानपूर्वक नम्रता राऊत (सभापती) यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी गट विकास अधिकारी किरण कोवे, सहा गट विकास अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी सुभाष जाधव, शापोआ अधिक्षक राजेश लोखंडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ प्रियवंदा सिरास यांची प्रमुख उपस्थिती होती.

कृषी अधिकारी पाटील 

तसेच सर्व विभागाचे विस्तार अधिकारी सर्वश्री दिलीप कुहीटे, रामराव मडावी, गुलाब उमाठे, गोपाल कुनघटकर, वातकर, प्रमोद राऊत तसेच कक्ष अधिकारी धनविजय यांचेसह अनेक अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख शरद भांडारकर यांनी तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी छाया इंगोले यांनी पार पाडले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्वश्री वडे व फाले यांनी परिश्रम घेतले.