चांपागावच्या महाआरोग्य शिबिरात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

२५ लाभार्थ्यांना  यशस्वीपणे निशुल्क  मोतीबिंदू शस्त्रक्रिया 
अनिल पवार/उमरेड:


शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने "आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे", अशी आरोग्याची व्याख्या आहे .चांपा ग्रामपंचायत येथे नवीन पदभार हाती घेताच नवनिर्वाचित सरपंच मा .अतीश पवार यांनी गोरगरिबांच्या आरोग्याची जबाबदारी हाती घेतली व महा आरोग्य शिबिर आयोजित केले. चांपा ग्रामस्थांचे स्वस्थ आरोग्यकरीता व गावामध्ये नेत्र तपासणी , स्त्री रोग तपासणी , जनरल तपासणी आदी तपासण्याला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहेत .रेड स्वस्तिक सोसायटी, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन,हॉस्पिटल, खापरी आणि ग्रामपंचायत चांपा च्या संयुक्त विध्यमानाने, ५जानेवारी रोजी चांपा ग्रामपंचायत च्या परिसरात निःशुल्कआरोग्य तपासणी व मोफत औषधी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , चांपा येथे आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी व मोतीबिंदू लाभार्थी निवड,स्त्रीरोग तपासणी,जनरल तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले आहेत . शिबिरात 523 पेक्षा जास्त लोकांनी तपासणी केली,या मध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिये करीता 56 लाभार्थी निवडण्यात आले,सर्व लाभार्थ्यांची शस्त्रक्रियाकरीता १४जानेवारी पासून ते १९ जानेवारी पर्यंत स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटलमध्ये, निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रियेला सुरवात झाली आहे.आतापर्यंत २५ लाभार्थ्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आले , असून लाभार्थ्यांचे गावातून निशुल्क वाहनाची सोय सरपंच अतीश पवार यांनी करून त्यांचे जेवण , औषधी राहण्याची सोय सुविधा ओषधी चे वाटप मोतीबिंदू शस्त्रक्रियाच्या लाभार्थ्यास निशुल्क करण्यात आले आहेत .