विज्ञानाने केली शास्त्राच्या साहित्यातून प्रगती:शिवाचार्य महाराज गडगेकर

ताडकळस/प्रतिनिधी:
ताडकळस येथे श्री महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्था ताडकळस व अखिल भारतीय विरशैव युवक संघटना शाखा ताडकळस यांच्या संयुक्त विद्यमाने दि.04 जानेवारी शनिवार रोजी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर भव्य सत्संग सोहळा व जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .

या कार्यक्रमात अमृतरूपी ,अमृततुल्य उपदेश देताना श्री ष.ब्र.सिध्देश्वलिंग शिवाचार्य महाराज गडगेकर म्हणाले की सध्यास्थितीला ज्या पध्दतीने विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे ती प्रगती शास्त्रात आधीपासूनच झाली होती आणि याचाच आधार घेत विज्ञानाने आपली प्रगती साधली आहे त्यामुळे माणसाने विज्ञाना बरोबरच शास्त्र पध्दतीचा सुध्दा अवलंब करायला हवा असे केल्यास माणुस आपली योग्य प्रगती करू शकेल व त्याचबरोबर आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा प्रत्येकाला अभिमान असायला हवा अशा प्रकारचे उदगार त्यांनी यावेळी व्यक्त केले .व त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या जिल्हा स्तरीय स्पर्धेत भजन स्पर्धेत जिल्ह्यातील भजनी मंडळींनी उस्फूर्त प्रतिसाद नोंदवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली या मध्ये शिव पार्वती भजनी मंडळ पेठशिवनी ता.पालम ,विरशैव भजनी मंडळ ताडकळस ,श्री संत मोतीराम महाराज भजनी मंडळ फळा ,नागनाथ भजनी मंडळ ताडकळस ,स्वरधारा भजनी मंडळ पिंपरण ,महारूद्र भजनी मंडळ ताडकळस ,नंदकिशोर भजनी मंडळ सोनपेठ ,पांडुरंग भजनी मंडळ ताडकळस ,कळेश्वर भजनी मंडळ करगाव ता.पुर्णा ,जय संतोषी माता भजनी मंडळ ताडकळस ,विरशैव भजनी मंडळ वाणीपिंपळगाव ,जय मल्हार भजनी मंडळ ताडकळस ,त्रंबकेश्वर भजनी मंडळ फुलकळस ,जय भवानी भजनी मंडळ ताडकळस सह आदी भजनी मंडळींनी या भजन स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. 

या भजन स्पर्धेतील विजेत्या भजनी मंडळींना ताडकळस येथील लोकप्रतिनिधींच्या वतीने रोख बक्षीस ठेवण्यात आले होते यात या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या पिंपरण येथील स्वरधारा भजनी मंडळास ताडकळस येथील सरपंच सौ.सुनीताताई राजु पाटील आंबोरे यांच्या वतीने रोख 11111 रू. ,द्वितीय क्रमांक पटकावलेल्या श्री संत मोतीराम महाराज भजनी मंडळ फळा यांना येथील जिल्हा परिषद सदस्या सौ.इंदुताई गणेशराव आंबोरे यांच्या वतीने रोख 5111 रू. ,तर तृतीय क्रमांक पटकावलेल्या सोनपेठ येथील नंदकिशोर भजनी मंडळास ताडकळस येथील संतोषभाऊ मुरकुटे मित्र मंडळाचे पुर्णा तालुका संपर्क प्रमुख गोपाळ रामराव आंबोरे यांच्या वतीने रोख 3111 रू. बक्षीस स्वरूपात वितरीत करण्यात आले .

व त्याचबरोबर या स्पर्धेतील उत्तेजनार्थ बक्षीस उत्कृष्ट गायक पुरूष रोख 1100 रू.भाजपाचे जि.प.सर्कल ताडकळस चे अध्यक्ष विजयराव साखरे यांच्या वतीने , उत्कृष्ट गायक महिला रोख 1100रू.ताडकळस चे उपसरपंच खंडेराव वावरे यांच्या वतीने ,उत्कृष्ट मृदंगवादक रोख 1100रू.येथील लोक कलावंत राम शावकार रूद्रवार यांच्या वतीने कळेश्वर भजनी मंडळ कळगाव यांना तर उत्कृष्ट हार्मोनियम चे 1100रू. रोख पारितोषिक भाजपाचे ताडकळस शहराध्यक्ष मनु पाटील आंबोरे यांच्या वतीने त्रंबकेश्वर भजनी मंडळ फुलकळस यांना प्रदान करण्यात आले .

या कार्यक्रमात मा.खा.तुकाराम रेंगे ,शिवा संघटनेचे जिल्हा प्रमुख डाॅ.मदन लांडगे ,विठ्ठल रणबावरे ,वीरभद्र स्वामी परभणीकर ,शिवाजीआप्पा मसुरे वालुरकर ,सुभाषआप्पा शिंदे सेलुकर ,मारोतीआप्पा भांगे वसमतकर ,महालिंगआप्पा कुरे जिंतुरकर ,ताडकळस चे मा.सरपंच बालासाहेब साखरे ,राजु पाटील आंबोरे , गणेशराव आंबोरे , बालाजी रूद्रवार , वामन तुवर ,ताडकळस पत्रकार संघटनेचे अध्यक्ष धुराजी होनमणे ,माणिकराव लाकडे , मदनराव आंबोरे ,सुरेश मगरे , व्यंकटेश पवार ,बालासाहेब कापसे ,रामराव आंबोरे ,सुधाकर आंबोरे ,रामप्रसाद आंबोरे ,नरहरी रूद्रवार ,त्रिंबक आंबोरे ,बाळासाहेब राऊत ,राजेंद्र मगरे ,गयबी भालेराव ,निरज घोंन्सीकर आदी मान्यवरांसह ताडकळस व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते .

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तुकाराम आळणे ,उपाध्यक्ष भोजराज सोनटक्के ,कार्याध्यक्ष बालाजी सालमोटे ,सह कार्याध्यक्ष विजय साखरे ,स्वागतोत्सुक पत्रकार लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी) ,भारत लाकडे ,यांच्यासह संयोजन समीतीचे सूर्यकांत उदगिरे ,पांडुरंग मुरकुंदे ,जगनअप्पा खाकरे ,व्यंकटी महाराज ,बबनअप्पा बोचरे ,लक्ष्मण जाधव ,बबनराव माने ,बबनराव खटिंग ,नारायण होनमणे ,ज्ञानेश्वर आळणे ,सुबोध उदगिरे ,गजानन आळणे ,धोंडीराम शिराळे ,बालाजी क्षीरसागर ,विजय आळणे ,अक्षय सोनटक्के ,बापुराव सवंडकर ,आदींसह येथील अखिल भारतीय विरशैव युवक संघटना शाखा ताडकळस च्या पदाधिकारी यांच्या सह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .