श्रीमंत राजे डाॅ. मुधोजी महाराज भोसले यांची चंद्रपूर भेट


चंद्रपूर-  भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने संयुक्तिक रित्या उभारला जाणारा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातील दुसरी सैनिक शाळा भारत सरकार च्या रक्षा मंत्रालयाच्या वतीने नागपूर महाराज श्रीमंत राजे डाॅ. मुधोजी महाराज भोसले यांना सदिच्छा भेटीसाठी आमंत्रित केले. व महाराजांनी भेट दिली. 

या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे भारतात शासनाच्या एकूण 29 शाळा आहे. त्या पैकी महाराष्ट्रात दोन 1 सातारा दुसरी चंद्रपूर (अजून काम चालू आहे), महाराष्ट्रातील पहिली आधुनीक शाळा, या शाळेचा एकूण परिसर 124 एकरचा आहे, शाळा उभारणीसाठी चा खर्च एकूण 490 करोड आहे.  या प्रकल्पाची माहिती ब्रिगेडियर श्री. सुनिल गावपांडे व त्यांच्या अधिकार्यांनी दिली. या वेळी महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टचे सदस्य श्री. रमेश पवार उपस्थित होते
 संत गजानन गौरव गाथा समिती, चंद्रपूर च्या वतीने आयोजित श्री. संत गजानन गौरव गाथा व संगीत संध्या या भव्य सोहळ्याचे उद्घाटन नागपूर महाराज श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले यांच्या हस्ते झाले.
       या सोहळ्यास स्वामी दिव्यानंद सरस्वती महाराष्ट्राचे वनमंत्री, अर्थमंत्री व चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुंनगट्टीवार, गजानन महाराज साहित्यांचे अभ्यासक श्री. सुनिल देशपांडे, आमदार श्री. नाना श्यामकुळे, श्री. धनजीभाई चव्हाण, महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टचे सदस्य श्री. रमेश पवार, श्री. धैर्यशील शिर्के,  चंद्रपूर जिल्हायातील सर्व लोकप्रतिनिधी व 12 हजारांच्या वर महिला, पुरूष भक्तगण उपस्थित होते.
        या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष श्री. जयंत मामीडवार समितीच्या पदाधिकारी व भक्तानी अथक परिश्रम घेतले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे समन्वयक श्री. गजानन देशपांडे नी केले.